शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

थकबाकीदारांची चौकात यादी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:42 IST

नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. हे टार्गेट सर करण्यासाठी नगर परिषदेने यंदा कठोर पाऊले उचलत कंबर कसली आहे.

ठळक मुद्देमालमत्ता करवसुली : पालिकेचे कठोर पाऊल, मोहीमेकडे लक्ष

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. हे टार्गेट सर करण्यासाठी नगर परिषदेने यंदा कठोर पाऊले उचलत कंबर कसली आहे. यासाठी नगर परिषदेने थकबाकीदारांना कर भरा अन्यथा मालमत्ता जप्ती व थकबाकीदारांच्या नावांची यादी शहरातील चौकाचौकांत लावण्याचा इशाराच दिला आहे.नगर परिषदेला सर्वात मोठी डोकेदुखीचे काम मालमत्ता कर वसुलीचे झाले आहे. शहरात अनेक श्रीमंताकडे मालमत्ता कराची मोठी रक्कम थकीत आहे. अशात यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण ९.२० कोटी रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे. त्यात मागील वर्षापासून राज्य शासनाकडून शंभर टक्के कर वसुलीचा फतवा काढल्याने नगर परिषदेची चांगलीच अडचण होत आहे. शंभर टक्के कर वसुली अशक्य असतानाही कर वसुली विभागाचे कर्मचारी मात्र थकबाकीदारांकडे जाऊन जास्तीत जास्त कर वसुली करीत आहेत. पण, कित्येक थकबाकीदार काहीना काही शक्कल लढवून कराचा भरणा टाळतात. हाच प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू असल्यामुळे नगर परिषदेची मागील थकबाकी चांगलीच वाढली आहे. या प्रकारावर आळा बसावा म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार मागील वर्षीही नगर परिषदेने थकबाकीदारांची मालमत्ता सील केल्याने चांगले परिणाम मिळाले. यंदा तर नगर परिषदेने थकबाकीदारांची गय करायची नाही असेच काही ठरविले आहे. नगर परिषदेने आतापासूनच थकबाकीदारांना त्यांच्याकडील मालमत्ता कराचा भराणा करा असे आवाहन केले. अन्यथा थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्यांच्या नावांची यादी शहरातील चौकाचौकांत लावण्याचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही नगर परिषदेने हाच प्रयोग अंमलात आणला होता. त्याचे चांगले परिणाम नगर परिषदेला बघावयास मिळाले होते. त्यामुळे यंदाही नगर परिषद तोच प्रयोग राबविणार आहे.सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरूनगर परिषदेने थकबाकीदारांना २८ तारखेपर्यंत कराचा भरणा करण्याची वेळ दिली आहे. यासाठी सुटीच्या दिवशीही दुसºया व चौथ्या शनिवारीही मालमत्ता कर विभाग सुरू ठेवले जाणार आहे. शहरवासीयांना याबाबत माहिती व्हावी यासाठी मुनादीही केली जात आहे. मागील नगर परिषदेने ५२ टक्के कर वसुली केल्याची माहिती आहे. यंदा यात किती भर पडते हे येणाºया काळातच कळेल.