शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाची विक्री करणारे १० कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:11 IST

कृषी विभागाची कारवाई: तपासणी मोहिमेदरम्यान आढळली अनियमितता

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कृषी सेवा केंद्र पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे. या गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान नियमाचे उल्लघंन करणाऱ्या १० कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले.

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणांमुळे १० निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. 

शेतकऱ्यांनी करावी तक्रारकृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिकिंग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करताना कृषी सेवा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावे, त्यावरील नमूद एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपीपेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.

या कृषी केंद्रावर कारवाई श्री गणेश कृषी केंद्र, पांढराबोडी, ता. गोंदिया- बियाणे परवाना १ महिन्या- करिता, 1. मॉ अंबे कृषी केंद्र, दासगाव, ता. गोंदिया- बियाणे परवाना ६ महिन्यां- करिता, किसान क्रांती कृषी सेवा केंद्र, बाह्मणी, ता. सडक अर्जुनी- बियाणे परवाना २ महिन्यांकरिता, नागपुरे अॅग्रो एजन्सी गोवारीटोला, ता. सालेकसा कीटकनाशके परवाना १ महिन्याकरिता, किसान सेवा कृषी केंद्र, झालिया, ता. सालेकसा- कीटकनाशके परवाना १ महिन्याकरिता, आरोही कृषी केंद्र, नवेझरी, ता. तिरोडा- कीटकनाशके परवाना १ महिन्याकरिता, यशोदा कृषी केंद्र, नवेझरी, ता. तिरोडा- कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता, गुर्वेश ट्रेडर्स व कृषी सेवा केंद्र, धामणगाव, ता. आमगाव- कीटकनाशके परवाना ४ महिन्यांकरिता, येरणे कृषी केंद्र, ओवारा, ता. देवरी- खत परवाना ६ महिन्यां- करिता, ठाकरे कृषी केंद्र वडद, ता. आमगाव- खत परवाना २ महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला.

या नियमाने होईल कारवाई बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, नाशक कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ नुसार संबंधित कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आडसुळे यांनी कळविले आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया