शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

प्लास्टीक बंदीसाठी धडकले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पर्यावरणाला सर्वाधिक घातक ठरत असलेल्या प्लास्टीकच्या वापरावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असले ...

ठळक मुद्देकृती आराखडा तयार करा : न.प.ला तयार करायचे पथक व आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरणाला सर्वाधिक घातक ठरत असलेल्या प्लास्टीकच्या वापरावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टीकचा वापर सुरूच आहे. ही बाब गांभीर्याने घेत पर्यावरण मंत्र्यांनी राज्यात पूर्णपणे प्लास्टीक बंदीचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने, नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालयाने प्लास्टीक निर्बंधाबाबत प्रभावी अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करण्याबाबत पत्र धाडले आहे. नगर परिषदेला त्यानुसार प्लास्टीक निर्मुलनासाठी पथक व संबंधित अन्य विषयांना घेऊन आराखडा तयार करायचा आहे. प्लास्टीकचे पर्यावरणावरील दुष्परिणाम लक्षात घेत राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे. चार दिवस कारवाया केल्यानंतर मोहीम थंडावत असल्याने प्लास्टीकचा वापर सर्रास सुरू आहे. त्यातही प्लास्टीक पिशव्या सर्वाधिक घातक ठरत असतानाही त्यांचा वापर उघडपणे दिसून येत आहे. परिणामी प्लास्टीक बंदीचा राज्यात पार फज्जा उडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. हीच बाब हेरून पर्यावरण मंत्र्यांनी प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, नगर परिषद प्रशासनाकडून जिल्हाधिकारी व नगर परिषदांना पत्र धाडण्यात आले आहे. या पत्रानुसार, नगर परिषदेला शहर व शहरालगत क्षेत्रात अस्तीत्वात असलेले सर्वप्रकारचे प्लास्टीक उचलून त्यांची विल्हेवाट लावायची आहे. सिंगल यूज प्लास्टीक वापर न करण्याबाबत स्वत: बंधन टाकून त्याचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. प्लास्टीक पिशव्यांचा उपयोग करणार नाही व करून देणार नाही याचा प्रत्येकाने निर्धार करून प्रचार-प्रसार करायचा आहे. कापडी पिशव्यांचा वापर करणे व त्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक कृती करायची आहे. प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांचे नाव व ठिकाण प्लास्टीक निर्बंध यंत्रणेला कळविण्यासाठी विशिष्ट दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, वेबसाईट उपलब्ध करून त्यावर तक्रारी नोंदविण्यासाठी जनतेला आवाहन करायचे आहे.जनजागृती कार्यक्रमांवर भरयाशिवाय, कार्यक्षेत्रात निर्बंध टाकलेल्या प्लास्टीकच्या वस्तू तयार, उत्पादीत, वापर, विक्री, वाहतूक, साठवणूक होणार याची याकरीता जागरूक राहून अशा व्यक्ती, संस्था, दुकाने व व्यापाऱ्यांवर सातत्याने लक्ष देऊन दंडात्मक कार्यवाही करून त्यास प्रसिद्धी द्यायची आहे. प्लास्टीकचा वापर करण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती व इतर कार्यकम घ्यायचे आहेत.यांचा सक्रिय सहभाग घेता येणारमहाराष्ट्र राज्य ‘सिंगल यूज’प्लास्टीक मुक्त राज्य करावयाचे असल्याने या मोहीमेत जास्तीत जास्त लोकांचा सक्रिय सहभाग घेता येणार आहे. यात शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालय, गृहनिर्माण संस्था, विविध संस्था, युवकांचे मंडळ, एनएसएस, एनसीसी, लायंस क्लब, रोटरी क्लब, सेवाभावी संस्था, व्यापारी-उद्योग-व्यावसायीक मंडळ, बचतगट, लॉन व मंगल कार्यालये, मंडप डेकोरेशन व्यावसायी, हॉटेल, उपहारगृहे, छोट्या टपºया, पानठेले, रेल्वे स्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजीपाला मार्केट, मांस विक्रेते आदिंच्या बैठका घेऊन त्यांना सहभागी करता येईल.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी