लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : राखीव जलसाठा ठेवून पिण्याच्या पाण्यासह शेतीला सिंचनासाठी संकटाच्या वेळी उपयोगी पडणारे सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोका सुद्धा वाढला आहे.महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमेलगत बिजेपार ग्रामपंचायतच्या हद्दीत कालीसरार धरण आहे. या धरणा खालून वाहणारा नाला सालेकसा आणि देवरी तालुक्याला विभाजीत करतो. अतिसंवेदनशील भागात असलेला या प्रकल्पातून पाणी सिंचन करण्यासाठी स्वतंत्र कालवे नसून या धरणाच्या पाण्याची गरज पडल्यास ते पाणी सरळ पुजारीटोला धरणात सोडले जाते व गरजेनुसार पाण्याचे वितरण केले जाते. परंतु या धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने येथील पाणी वापरात कमी व वाया जास्त जाते. लाख मोलाचे पाणी दरवर्षी उपयोग विना सुध्दा संपून जाते. परंतु बाष्पीभवन होऊन पाणी कमी झाले असे उत्तर येथील संबंधित विभागाचे कर्मचारी देतात.एखाद्या वर्षी येथील पाण्याचा उपयोग केला नाही तरी पाण्याची पातळी अगदी ३० ते ३५ टक्के पर्यंत खाली येते. अर्थात लिकेजमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते हे कुणीच नाकारु शकत नाही. परंतु लिकेजकडे सतत दुर्लक्ष केल्यास धरण फुटण्याचा सुध्दा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.कालीसरार धरणाला एकूण चार दरवाजे असून एक टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठवण करण्याची क्षमता या धरणात आहे. जेव्हा या धरणातून पाणी सोडले जाते तेव्हा डाव्या बाजूच्या भिंतीला असलेल्या लिकेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. अशात लिकेज आणखी मोठा झाला तर धोका ही वाढेल.येथील पाणी सुरक्षित राहिले तर दोन्ही हंगामात दोन हजार हेक्टर शेतीला भरपूर पाणी सिंचन होईल एवढ्या पाण्याची मदत कालीसरार धरणातून पुजारीटोला धरणाला मिळू शकेल. कालीसरारचे पाणी विशेष करुन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाते. परंतु उन्हाळा येईपर्यत धरण अनेकदा रिकामे होते. अशात या धरणाचे पाणी शेवटपर्यंत संग्रहीत व सुरक्षित राहावे म्हणून प्रयत्न केले पाहिजे. नक्षलग्रस्त भागात असलेल्या या धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे लक्ष देणे सुध्दा आवश्यक आहे.
कालीसरार धरणाच्या भिंतीला लिकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST
महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमेलगत बिजेपार ग्रामपंचायतच्या हद्दीत कालीसरार धरण आहे. या धरणा खालून वाहणारा नाला सालेकसा आणि देवरी तालुक्याला विभाजीत करतो. अतिसंवेदनशील भागात असलेला या प्रकल्पातून पाणी सिंचन करण्यासाठी स्वतंत्र कालवे नसून या धरणाच्या पाण्याची गरज पडल्यास ते पाणी सरळ पुजारीटोला धरणात सोडले जाते व गरजेनुसार पाण्याचे वितरण केले जाते.
कालीसरार धरणाच्या भिंतीला लिकेज
ठळक मुद्देधरण फुटण्याची शक्यता : रोजंदारी मजुराच्या भरवशावर धरणाची देखरेख