शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

कोरोनासोबतच शेतकऱ्यांवर किडीचे मोठे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक कोपामुळे तोंडचा घास हिरावण्याची भीती : बळीराजा चिंतातूर

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की बागायती, शेतात धान असो की भाजीपाला, आज निसर्गाच्या कोपामुळे कुणाचेच चालेना. पोशिंद्यांना चहुबाजूंनी वार सहन करावे लागतात. यावर्षी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. काकडी, टरबूजसारखे वेलवर्गीय पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानालाही किडीने ग्रासले. १५ दिवसात पीक घरात येणार होते ते आता येईल याची शाश्वतीच उरली नाही. बळीराजाचे स्वप्न भंगणार अशीच चिन्ह आहेत.शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे. धानाची पूर्ण उगवण झाल्यानंतर सर्व ओंब्या पांढऱ्या-शुभ्र ओंबी निघत आहेत. सर्व शेतं पांढरीची पांढरी होऊ लागली आहेत.अशाही अवस्थेत शेतकरी कृषी केंद्रांवर किटनाशके खरेदीसाठी रांगा लावून आहेत. पण शेती वाचेल हे सांगायला कुणी तयार नाही. धानाची उगवण झाल्यानंतर कधी नव्हे अशी कीड जी यापूर्वी कधीच पाहिली नाही असे शेतकरी सांगतात. यावर्षी एक, दोन दिवस लोटले की अवकाळी पाऊस हजेरी लावतो. काही ठिकाणी वादळवारा व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी खचला आहे. या अशा वातावरणाच्या परिणामामुळे काकडी, टरबूज, टमाटर वांगी, मिरची, उडीद मूग, हरभरा ही पिकं उध्वस्त झाली आहेत. धान निघायला आता जेमतेम १५-२० दिवसांचा कालावधी उरला आहे. काल-परवापर्यंत हाच धान बघून यंदा चांगले पीक येणार अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच देशावर कोरोनाचे संकट आले.समोर लग्नसराई आहे.शेतात वांगी, काकडी, व वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करून अधिकचे पैसे कमवायचे या आशेपोटी ओलिताची सोय आहे म्हणून भाजीपाला पिकविला. त्याची काही आॅर्डरही नोंदवून झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव व संचारबंदीमुळे सर्व आयोजित विवाहसोहळे रद्द झाले. त्यामुळे घेतलेले आॅर्डरही रद्द झाले. एवढा मोठा शेतमाल विक्र ीला न्यायचा कुठे ? असा प्रश्न शेतकºयांना पडला. हा शेतमाल शेतातच पडून सडला तर वांगी पूर्णपणे पिकून गेली. शेवटी ती फेकून द्यावी लागली. भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे तर वेगळेच हाल आहेत. कोरोनामुळे माल बाजारात आणायची भीती आहे.माल आणला तरी तो विकेलच याची शाश्वती नाही. त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळतीलच अशी हमी नाही. वेलवर्गीय पिकाच्या रुपात नगदी पैसा मिळावा हे शेतकºयांचे स्वप्न पार धुळीस मिळाले. हातीबोटी असलेला पैसा लागवड खर्चात गेला. पदरी काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती. तीही पूर्णत्वास आली नाही. तोच कोरोनाचा प्रकोप आला. त्याचा सामना करताना आता दमछाक होऊ लागली आहे.शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज द्याभाजीपाला, टरबूज, काकडी पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानही जाण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी शेतकरी खचला नव्हता. पण कोरोना बरोबरच निसर्गही कोपला. धानपिक सोडून नगदी पैशासाठी काही गुंठ्यात भाजीपाला लागवड केली. पाऊस, वादळवारा व गारपिटीने ते उध्वस्त झाले. १५ दिवसात पीक येईल, समृद्धी नांदेल असे वाटत असतानाच हिरवाकंच धान पांढरा शुभ्र होतांना दिसतो. कोरोनाचे संकट पेलवत असताना हे नवीन संकट आता शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.शेतकरी बांधवांनी काय करावं तेच कळत नाही. शेतकºयांना या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे पॅकेज देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती