लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद सभापती निवडणुकीला घेऊन पक्षांमध्ये सेटींगला सुरूवात झाली असून कोठे गटनेतासाठी तर कोठे खुर्चीसाठी जोड-तोड केली जात असल्याचे चित्र शुक्रवारी पाहयला मिळाले. यातच शहर परिवर्तन आघाडीच्या गटनेता म्हणून ललीता यादव यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने निवडणुकीची चुरस वाढली. खुर्चीसाठी नगर परिषदेतील सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र नेमके काय ते शुक्रवारी (दि.१४) रात्री उशिरा ठरणार आहे.नगर परिषद विषय समिती सभापतींची निवडणूक शनिवारी (दि.१५) होणार आहे. सध्या नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. यंदा मात्र त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण दिसत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षच काय राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शहर परिवर्तन आघाडीकडून आपापल्यापरीने जोड-तोड सुरू होती.विशेष म्हणजे, आतापर्यंत भाजपसाठी अनुकुल वातावरण असतानाच शहर परिवर्तन आघाडीच्या गटनेता म्हणून ललीता यादव यांच्या निवडीला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्याने या निवडणुकीचे संपूर्ण समिकरणच बदलून गेले. सध्या नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १९, राष्ट्रवादीचे सात, कॉँग्रेसचे नऊ व शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य आहेत. नियमानुसार, ११ सदस्यांच्या विषय समितीत संख्याबळाच्या आधारे भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे दोन, कॉँग्रेसचे दोन व आघाडीचे दोन सदस्य पाठविले जातात.आता मात्र आघाडीच्या गटनेतापदी यादव यांची निवड झाल्याने हे समीकरण भाजप विरोधी ठरणार असल्याचे दिसते.त्यामुळे भाजपला ही निवडणूक कठीण दिसून येत आहे.भाजप-कॉँग्रेस की तिकडीचे समीकरणआघाडीच्या गटनेतापदी यादव यांची निवड वैध ठरल्यानंतर सभापती निवडणुकीचे संपूर्ण समिकरण बदलून गेले आहे. त्यामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढली असून त्यांना कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागणार आहे.अशात आता नगर परिषदेत भाजप-कॉँग्रेसची हातमिळवणी किंवा कॉँग्रेस-राष्ट्रवादी व आघाडीची तिकडी बनते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपमध्ये पक्षनेता बदलण्याच्या हालचालीनिवडणुकीला घेऊन तापलेल्या राजकारणात भाजपमधील सदस्यांचे अंतर्गत कलह पुढे आले. यातूनच पक्षनेता बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या.भापजमध्ये सदस्यांचे दोन गट तयार झाले व त्यातूनच संख्याबळ जास्त असलेल्या सदस्यांनी पक्षनेता बदलण्याची तयार सुरू केली अशा चर्चा ऐकिवात होत्या.त्यामुळे आता शनिवारी (दि.१५) नेमके काय चित्र बघावयास मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आघाडीच्या गटनेतापदी ललीता यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST
नगर परिषद विषय समिती सभापतींची निवडणूक शनिवारी (दि.१५) होणार आहे. सध्या नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. यंदा मात्र त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण दिसत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षच काय राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शहर परिवर्तन आघाडीकडून आपापल्यापरीने जोड-तोड सुरू होती.
आघाडीच्या गटनेतापदी ललीता यादव
ठळक मुद्देसभापती निवडणुकीत वाढली चुरस : पक्षांकडून सुरू आहे मोर्चेबांधणी