शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद; २७ हजार महिलांचे अर्ज रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:26 IST

Gondia : राजकीय आरोपांमुळे योजनेच्या भविष्याबाबत उलट-सुलट चर्चा; बोगस लाभार्थ्यांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला; पण यादरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा महिलांचा शोध सुरू केला. 

यादरम्यान जिल्ह्यातील सुमारे २६ हजार ९२७महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिला. दरम्यान आता या योजनेची नोंदणीही बंद झाली आहे. नोंदणी बंद होऊन नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. यादरम्यान काही महिला वंचित आहेत.

आधार लिंकवरून लाभाची पडताळणी होणार'लाडकी बहीण' योजनेचा लाभघेण्यासाठी संबंधित महिलेचा आधार क्रमांक बैंक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. तेव्हाच अनुदानाची रक्कम मिळते. माध्यमातून जिल्ह्यातील 'नमो शेतकरी सन्मान योजने'त सहभागी महिलांचा शोध घेतला जातो आहे.

...तर होऊ शकतो अर्ज बादकुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक किंवा कुटुंबात आयकरदाता सदस्य असेल, तर कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर अर्ज बाद होईल. इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १,५०० पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध उपक्रमांपैकी एखाद्या उपक्रमात संचालक अथवा सदस्य असेल, तर कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरीही त्या महिलेचा अर्ज बाद ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल तर अर्ज रद्द केला जाईल.

आयकर भरणाऱ्या महिलांना वगळणार...गोंदिया जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ५०७ महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला. 'डीबीटी'द्वारे थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले; परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता मात्र मिळालेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबात कार असेल, अशा महिलांची नावे योजनेतून वगळली जाणार असल्याने लाभार्थी महिलांची संख्या घटणार आहे. 'आयटीआर' भरणाऱ्यांनीही फॉर्म भरलेले होते. त्यांचीही नावे वगळली जाणार आहेत.

३.३७ लाख महिला लाभार्थी...गोंदिया जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे ३ लाख ३७ हजार ५०७लाभार्थी आहेत. सध्या १ हजार ५०० रुपयांचा लाभ घेत आहेत. आगामी हप्त्यानंतर ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

२७ हजार महिलांचे अर्ज रद्दजिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ९२७महिलांनी अर्ज रद्द झाले आहेत. 'लाडकी बहीण'चा लाभ देण्यात येत नाही. येत्या काळात लाभ सोडणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

"ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल झाले त्याच वेळेस इतर योजनांमधून पैसे मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून ते वजा केले जातील, अशी सूचना आली आहे. त्यामुळे त्यासंदर्भात इतर आदेश येण्याची गरज नाही. अशा महिलांनी अनुदान नाकारले आहे. याशिवाय आता नवीन महिलांची नोंदणी बंद करण्यात आली आहे."- कीर्तीकुमार कटरे, महिला व बालविकास अधिकारी, गोंदिया. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाgondiya-acगोंदिया