जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:00 AM2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:08+5:30

कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाटयाने कमी होवून रुग्णाचा मृत्त्यू होतो. फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.

Lack of remedivir injection in the district | जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

Next
ठळक मुद्देशासकीय रुग्णालयात मोजकाच साठा : रुग्णांच्या संख्येत वाढीमुळे तुटवडा, अतिरिक्त दराने विक्री होत असल्याची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडयात सातत्याने वाढ होत आहे. २२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ३६०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने यासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मागील सात आठ दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाटयाने कमी होवून रुग्णाचा मृत्त्यू होतो. फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढले आहे.
शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालय सुध्दा हाऊस फुल आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) पुन्हा सहा खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. अशात कोविडच्या गंभीर रुग्णावर उपयुक्त समजल्या जाणाºया रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे.
सद्यस्थितीत गोंदिया येथे दररोज पाचशे इंजेक्शनची मागणी आहे. पण त्या तुलनेत कंपन्याकडून पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील सहा खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून सुध्दा रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मागणी वाढलीे आहे. पंरतू गोंदियासह इतर जिल्ह्यात सुध्दा कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत असल्याने तेथे देखील या इंजेक्शनची मागणी वाढली आहे.

शासकीय रुग्णालयात मोजकाच साठा
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच शहरात पाच सहा कोविड केअर सेंटर असून येथे सुध्दा दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत केवळ ४० रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मेडिकलने पुन्हा दोन हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात सुध्दा हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती आहे.
विक्रेते म्हणतात आठ दिवसात येणार साठा
शहरातील औषध विक्रेत्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असून कंपन्याकडून पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. सध्या स्थितीत गोंदिया येथील औषध विक्रेत्यांकडे १० ते १५ रेमडेसिव्हीर इंजेक्शन सुध्दा मिळणे कठीेण आहे. मात्र यासंदर्भात कंपन्याशी बोलणे सुरु असून येत्या आठ दिवसात या इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

तुटवडयामुळे किमतीत वाढ
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. या इंजेक्शनची मुळ किमत ४ हजार रुपये आहे. मात्र काही औषध विक्रेते या संधीचा फायदा घेत या इंजेक्शनची सात ते आठ हजार रुपयांना विक्री होत असल्याची ओरड वाढली आहे.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मागील आठवडाभरापासून तुटवडा आहे.या इंजेक्शनला वाढलेली मागणी लक्षात घेवून पुरवठा करणाºया कंपनीकडे मागणी केली आहे. येत्या पाच सहा दिवसात या इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध होईल. मात्र गोंदिया शहरात या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू नाही.
उत्पल शर्मा, अध्यक्ष केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन गोंदिया
कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दोन हजार रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मागणी केली आहे. सद्यस्थितीेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४० इंजेक्शन उपलब्ध आहे. तसेच कोरोनावर उपचारासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या इतर गोळया आणि इंजेक्शन सुध्दा उपलब्ध आहेत.
डॉ. व्ही.पी.रुखमोडे, विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: Lack of remedivir injection in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.