शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मग्रारोहयोच्या कामांवर सोयीसुविधांचा अभाव

By admin | Updated: May 12, 2017 01:19 IST

शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे.

प्रशासनाने लक्ष घालावे : मजुरांचे हित जोपासले जात नाही लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे. या कामावरील मजुरांना काही मुलभूत सोयीसुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांना प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि सावलीत विसावा घेण्याकरिता तात्पुरती झोपडीची व्यवस्था अशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे या कामांवरील मजुरांना उन्हाचे चटके सहन करीत काम करावे लागत आहे. त्यामुळे मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून रोजगार हमी योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आला. यानंतर मनरेगा ही योजना २००७ पासून अंमलात आली. या योजनेत मजुरांच्या हितांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. मागेल त्याला काम तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरवून योजना पारदर्शी ठेवण्याची तरतूद आहे. परंतु योजनेचे निकष बाजूला करुन अधिकाऱ्यांनी मजुरांच्या अधिकारांवर गंडांतर आणल्याचे चित्र दिसून येत आहे. कित्येक ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास प्राथमिक उपचार म्हणून औषधांची व्यवस्था करण्यात येते. मात्र कामावर प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मजुरांना पिण्याकरिता आपल्या घरून पाणी घेऊन यावे लागते. यावरून प्रशासन मजुरांच्या हिताप्रती किती सजग आहे, याची प्रचिती येत आहे. या योजनेत एकंदरीत मजूर भरडून निघत आहेत. पंचायत विभाग आणि जिल्हा रोजगार हमी योजना यंत्रणेने याकडे त्वरीत लक्ष घालून मजुरांच्या हिताकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मजुरांकडून होत आहे. उष्माघाताबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव जाणवतो. उष्माघाताने मृत्यूही होत असतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी आतापासून जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तापमानात प्रथम हळूहळू अथवा एकदम यापैकी कोणत्याही प्रकारे वाढ होत असते. उष्माघात होण्याची प्रमुख कारणांमध्ये उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, वाढत्या तापमानाशी सतत संबध येण्याचे कारणाने उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणे लकवा मारणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोळे दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन, अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणे असू शकतात. वाढत्या तापमानात फार वेळ कष्ठाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर व संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे काळ्या किंवा भडक रंगाची कपडे वापरू नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावीत, जलसंजीवनाचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत द्यावे, अधूनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी असे आरोग्य विभाग सांगते.