शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

नुकसानभरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:58 IST

संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती.

ठळक मुद्देबिंदल प्लाझा आगडोंब प्रकरण : पालकमंत्र्यांनी केली होती दोन-दोन लाखांच्या मदतीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. या घटनेला जवळपास आठ महिन्यांचा कालावधी होत आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी सदर घटना घडली होती. यात सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता.बिंदल प्लाझामध्ये आगडोंबमधील मृतकांच्या कुटुंबीयांनी शुक्रवार (दि.२४) गोंदिया येथे एकदुसºयांची भेट घेतली. त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. हॉटेल बिंदल प्लाझाचा सध्या जीर्णोद्धार केला जात आहे. त्यांनी प्रशासनाला मागणी करीत सांगितले की, हॉटेल बिंदल प्लाझा आगडोंब प्रकरणाची पुनर्रावृत्ती होवू शकते. यासाठी सदर बांधकाम कार्य त्वरित थांबविण्यात यावे. त्यांनी हॉटेल बिंदल प्लाझाची न्यायीक तपासणी करण्याची मागणी केली.हॉटेल बिंदल प्लाझाच्या तपासणीदरम्यान अनेक अनियमितता आढळल्या. रायपूर येथील तुलसी हॉटेलचे जीर्णोद्धार थांबविण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या वेळी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना बोलावून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.सदर आगडोंब प्रकरणात नागपूर येथील प्रेमकुमार साबू (३५) बिलासपूर येथील हरजित दीक्षित (२४), महू (मध्य प्रदेश) येथील सुरेंद्र सोनी (६३), इंदोर येथील रविंद्र लोहाडे (५४), वरोरा येथील आदित्य कुराडे (३१), सांगली येथील अभिजित पाटील, नागपूर येथील प्रवीण देशकर यांचा मृत्यू झाला होता. प्रेमकुमार यांचे काम, हरजितचे वडील रमेशचंद्र दीक्षित, सुरेंद्र व रविंद्र यांचे बहीणजावई अरूण अजमेरा, आदित्यचे वडील प्रा. अशोक कुराडे यांनी एका पत्रपरिषदेत सदर प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली.त्यांनी सांगितले की, न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान हॉटेलच्या मालकाला ते मिळाले. मात्र त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेबाबत संवेदनासुद्धा व्यक्त केली नाही. त्यांनी वेगळ्या स्वरूपात नुकसानभरपाईसाठी राज्य ग्राहक न्यायालयातसुद्धा प्रकरण दाखल केल्याची माहिती दिली. हॉटेलच्या जीर्णोद्धाराचे काम बंद करण्यात न आल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असेसुद्धा मृतकांच्या कुटुंबीयांनी सांगितले.- कुठून आले एवढे सिलेंडर?पोलिसांच्या अहवालात २२ सिलेंडर मिळाल्याचे नोंद आहे. एवढे मोठे सिलेंडर कुठून आले? जेव्हा रेस्टारेंट बंद होते तर त्या सिलेंडरची गरज का पडत होती? हॉटेलच्या खाली जी महासेल नामक कपड्याची दुकान होती. संपूर्ण पायºयांवर त्यांचा ताबा होता. परंतु आतापर्यंत जी महासेलच्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.फटाका दुकानांना अभयअरूण अजमेरा यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यापासून काही अंतरावरच फटाक्यांनी अनेक दुकाने आहेत. एवढ्या दाट लोकवस्तीत ही दुकाने असावी किंवा नाही? परिसरातील नागरिकांसह अनेकदा बैठक झाली. समझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकाºयांकडे तक्रारही करण्यात आली. परंतु प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच तेथील दुकानेसुद्धा हटविण्यात आल्या नाही. एखाद्या मोठ्या घटनेची वाट तर प्रशासन पाहात नाही? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला.