शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूच्या IIM मध्ये गोंदियाचा कोहिनूर, पोराच्या कामगिरीचा सार्थ अभिमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 17:29 IST

कोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलोनी येथील निवासी असून मुळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी. डॉट. रिसर्च इंजिनियर या पदावर कार्यरत आहे.

ठळक मुद्देकोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलोनी येथील निवासी असून मुळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी. डॉट. रिसर्च इंजिनियर या पदावर कार्यरत आहे.

गोंदिया - देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या बेंगलोर येथील भारतीय प्रबंधन संस्थेत (आय.आय.एम) येथील पदव्युत्तर उच्च प्रबंधन अभ्यासक्रमासाठी गोंदियातील कोहिनूर कमलेश मेश्राम यांची निवड झाली आहे. देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या या संस्थेत आपल्या शहरातील विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे गोंदियाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलोनी येथील निवासी असून मुळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी. डॉट. रिसर्च इंजिनियर या पदावर कार्यरत आहे. या पदावर कार्यरत असताना वर्ष 2020 मध्ये त्याची निवड संयुक्त राष्ट्र आंतरिक नेवीगेशन ॲपच्या जिनेवा (स्विझरलँड) येथे झालेल्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती हे विशेष. या चमूचे कोहिनूर मेश्राम यांनी  प्रतिनिधित्व केले. आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी तसेच गोंदिया शहरासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. 

वर्ष 2020 मध्ये भारतीय प्रबंधन संस्था बंगळुरूच्या वतीने उच्च पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कोहिनूर  मेश्राम याने प्राविण्य सूचित प्रथम क्रमांक पटकावित आपल्या शहराचा नाव-लौकिक केलेला आहे. 

शिक्षिका कविता व कमलेश मेश्राम यांचा कोहिनूर हा मुलगा असून त्याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. बारावीच्या सी.बी.यस.सी. परीक्षेत देखील त्याने जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्याच बरोबर त्याला विविध खेळांचीही आवड आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना दिले आहे. कोहिनूरने संपादन केलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

कोहिनूरचा अभिमान

कोहिनूर हा लहानपणापासूनच हुशार आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही त्याने संपादन केलेल्या यशासाठी आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया वडिल कमलेश मेश्राम यांनी दिली.  

टॅग्स :BengaluruबेंगळूरEducationशिक्षणgondiya-acगोंदिया