शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

१० गावांतील धान पिकावर कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:21 IST

यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देआर्थिक नुकसानीचा धोका : कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.जिल्ह्यातील १० गावांत धान पिकावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागान दिला आहे. अस्मानी व सुल्तानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी पावसाने साथ दिली नाही. यंदा पावसाने साथ दिली तर किडरोगांनी डोकेदुखी वाढविली आहे. परिणामी शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धान पिकांवर किडरोगाचा प्रभाव असून तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.यात, तालुक्यातील रजेगाव, शिवनी, उमरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील घटेगाव, खोडशिवनी, हेटी (गिरोला), पुरकाबोडी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इसापूर, प्रतापगड व देवरी तालुक्यातील पिंडकेपार या गावांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीतील सर्वेक्षण करण्यात आले. त्या अहवालात रजेगाव येथे ०.६० टक्के, शिवनी येथे ०.८० टक्के, उमरी येथे ३.०७ टक्के, खोडकिड्याचा प्रभाव दिसून येत असल्याचे अहवालात नमूद आहे. तर घटेगाव येथे २.२० टक्के धान पिकावर कडा-करपाचा प्रभाव १७ तारखेपर्यंत होता.हेटी (गिरोला) येथे १.३ टक्के, घटेगाव येथे १.१५ टक्के, पुरकाबोडी येथे १.०५ टक्के, इसापूर येथे १.६५ टक्के, प्रतापगड येथे १.४८ टक्के पिकार कडा-करपाचा प्रभाव दिसला आहे. घटेगाव येथे १.५५ टक्के, खोडशिवनी येथे १.०२ टक्के, हेटी येथे १ टक्के, इसापूर येथे १.३ टक्के व पिंडकेपार येथे १.३३ टक्के मानमोडी किडींचा प्रकोप होता. तुडतुडाचा प्रकोप वाढण्याची शक्यता सध्या पाऊस थांबला असून चांगलेच उन्ह तापत आहे. अशा या वातावरणात धान पिकावर तुडतुड्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी विभागाने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात तुडतुडा नियंत्रण मोहिम चालविली होती. यामुळे याचा प्रभाव जिल्ह्यात कमी दिसला व त्यामुळेच नुकसानही कमी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.आता खोडकिडा गादमाशी, कडा-करपाचा धान पिकावर प्रभाव होण्याची शक्यता नाही. त्यांच्या प्रकोपाची वेळ आता निघून गेली आहे. मात्र वातावरण बघता तुडतुड्याचा प्रभाव दिसू शकतो. यामुळे सतर्क राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.-एन.वी.नयनवाडेप्रभारी सहायक, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस