शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आदिवासींचा कायापालट करण्यात ‘केशोरी’ यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

सन १९७५ ला केशोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याला सुरूवात करण्यात आली. १९७७ पासून या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोरगरीबांना आरोग्याच्या सोयी-सुविधा देण्यात येत आहे. सन २०१६ पूर्वी या आरोग्य केंद्रातून लोकांना सेवा मिळत होती. परंतु प्रभावी सेवा मिळत नव्हती. बहुदा रेफर टू गोंदिया असेच लिहिले जायचे. परंतु आता मागील चार वर्षापासून या आरोग्य केंद्राशी नागरिकांची नाळ जुळल्याने या आरोग्य केंद्रातून लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळू लागली.

ठळक मुद्दे३५ वर्षानंतर उत्तम आरोग्य सेवा : वर्षभरात ३२५ गर्भवतींची सुखरूप प्रसूती, प्राथमिक आरोग्य केंद्रापुढे ठेवला आदर्श

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. जिल्ह्यातील १०९ गावे नक्षलदृष्टया संवेदनशिल आहेत. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केशोरी हा परिसर नक्षलवाद्यांच्या बंदुकीच्या टोकावरच चालणारा भाग आहे. या भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे यशस्वी राहिले. नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल भागात राहणाऱ्या तब्बल ३२५ गर्भवतींची सुखरूप प्रसूती करणाºया या आरोग्य केंद्रांने आदिवासी जनतेचा आरोग्यासंदर्भात अत्यंत जीकरीने काळजी घेतली. परिणामी कायापालट करण्यात हे आरोग्य केंद्र जिल्ह्यातून एकमेव कायापालट योजनेच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.सन १९७५ ला केशोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याला सुरूवात करण्यात आली. १९७७ पासून या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोरगरीबांना आरोग्याच्या सोयी-सुविधा देण्यात येत आहे. सन २०१६ पूर्वी या आरोग्य केंद्रातून लोकांना सेवा मिळत होती. परंतु प्रभावी सेवा मिळत नव्हती. बहुदा रेफर टू गोंदिया असेच लिहिले जायचे. परंतु आता मागील चार वर्षापासून या आरोग्य केंद्राशी नागरिकांची नाळ जुळल्याने या आरोग्य केंद्रातून लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळू लागली.नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात या वर्षी ३२५ गर्भवतींच्या सुखरूप प्रसूती करण्यात आल्या. कुटुंब नियोजनच्या १६० शस्त्रक्रिया करून शंभर टक्के उद्दिष्टे साध्य केले. गर्भवतींचे व नवजात बाळांचे शंभर टक्के लसीकरण, ६५७ आंतररूग्ण तपासणी करण्यात आली. १७ हजार ११३ रूग्णांची ओपीडी काढण्यात आली. केशोरी परिसरातील २४ हजार नागरिकांची काळजी घेणारे दुर्गम भागातील हे आरोग्य केंद्र ग्रामीण रूग्णालयाला लाजवेल अशी सेवा देत आहे. अनेक ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केले जात नसते. परंतु या आरोग्य केंद्रात चालू वर्षात ८ मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. बाळंतिन झालेल्या महिलांना लगेच मुल होऊ नये यासाठी १३५ महिलांना तांबी बसविण्यात आली. ९५ टक्के महिलांना तांबी बसवून माता मृत्युवर आळा घालण्यात यशस्वी झालेले हे आरोग्य केंद्र शंभर टक्के बालमृत्यूंवर आळा घालणार आहे. परिसरातील अपघात व वनाने वेढलेल्या परिसरामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमींवर वेळीच उपचार करण्यासाठी येथील डॉक्टर व कर्मचारी सरसावतात.आदिवासींना उत्तम आरोग्य सेवा देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुकाअ डॉ. राजा दयानिधी, जिल्हा आारोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी विजय राऊत यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकू मंडल, डॉ.राकेश पेशने यांनी काम केले. ३५ वर्षापासून उत्तम आरोग्य सेवेची वाट पाहणाºया केशोरी पसिरातील जनतेला डॉ.पिंकू मंडल यांच्या माध्यमातून सन २०१६ पासून उत्तम आरोग्य सेवा दिली जात आहे. यासाठी केशोरी येथील आरोग्य सेवक विवेकानंद हाके, एस.सी.चोभरे, पलासपगार, कापत, मस्के, दादाजी कोरेवार, बाबाजी पंधरे, देवकस्कर, भोयर, राखी गाडगे, हटवार, मेश्राम, कांचन बोरकर, हेमलता कटरे, वर्षा गेडाम, भालाधरे, हिना वावरे, नेहारे, राठोड, सिंगणजुडे, मेश्राम, उरकुडे, कटरे, निशा नेताम, मांडवे, चंद्रकांत टेंभूर्णीकर, तुकाराम नाकाडे, रणदिवे, वालदे, गीता किरसान, संगीता शहारे, तिरगाम, लता खोब्रागडे व केशर उपराडे यांनी या आरोग्य केंद्राचा कायापालट करण्यासाठी मेहनत घेतली.लोकसहभागातून कायापालटकेशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ४५ वर्षापासून जुनी इमारत होती. या इमारतीला नवनीकरण करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात आले. स्थानिक ग्रामपंचायत, जि.प. सदस्य तेजूकला गहाने, प्रकाश गहाने, अश्वीन भालाधरे, हिरालाल शेंडे, प्रकाश वलथरे, अनिल लाडे, चरण चेटूले, बाबुराव पाटील गहाणे,श्रीकांत घाटबांधे व इतर गावकऱ्यांच्या मदतीने या आरोग्य केंद्राचा कायापालट करण्यासाठी शासनाची कवडीची मदतही न घेतला येथील डॉक्टर आणि कर्मचाºयांनी गावकºयांच्या मदतीने आरोग्य केंद्राचा उत्थान केला आहे.पहाडावरील तिरखुरी व नागनडोहाचे आरोग्य जपलेघनदाट जंगलाने वेढलेल्या तिरखुरी व नागनडोह येथील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर महिन्या-दीड महिन्याने या गावातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिर लावले जातात. पल्स पोलीओ व इतर सर्व राष्टÑीय कार्यक्रमांची अमंलबजाणी या ठिकाणी केली जाते. सोबतच उमरपायली, डोंगरगाव, डाकोटोला येथील जनतेसाठी आरोग्य सेवा उत्तमरित्या देण्यात येते. घनदाट जंगल परिसरातील लोकांवर मलेरियाचे संकट असते.परंतु या आरोग्य केंद्रातील उत्तम सेवेमुळे हिवतापावर नियंत्रण ठेवण्यात आले.कुपोषण व बालमृत्यू शुन्यावर आणण्याचे पुढचे ध्येय आहेत. गरोदर माता, स्तनदामाता व लहान बालके यांना आरोग्यसेवा अत्यंत प्रभावीपणे देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करू.-डॉ. पिंकू मंडल,वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी.

टॅग्स :Healthआरोग्य