शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

कन्हानचे ज्वेलर्स लुटणारे दरोडेखोर गोंदियात अटक

By admin | Updated: May 23, 2017 00:50 IST

कन्हानच्या गणेशनगरातील अमित ज्वेलर्स येथे पिस्तुलच्या धाकावर २७ लाखाचे दागिणे लुटणाऱ्या तीन आरोपींना नागपूर ग्रामीण व गोंदियाच्या ...

गोंदिया व नागपूर ग्रामीण एलसीबीची कारवाई : २७ लाखांचा माल जप्त लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कन्हानच्या गणेशनगरातील अमित ज्वेलर्स येथे पिस्तुलच्या धाकावर २७ लाखाचे दागिणे लुटणाऱ्या तीन आरोपींना नागपूर ग्रामीण व गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून आज (दि.२२) रोजी तिघांना अटक केली आहे. आरोपीनी रोख रक्कम खर्च केली. परंतु दागिणे त्याच्या जवळून जप्त करण्यात आले. कन्हानच्या गणेशनगरातील अमित ज्वेलर्समधून १४ मेच्या दुपारी २ ते ३ वाजता दरम्यान दिवसा ढवळ्या चौघांनी पिस्तुलच्या धाकावर दरोडा घातला होता. तिथून लुटलेले दागिणे व पैसे पकडून पोलिसांच्या भितीने आरोपी रामटेक त्यानंतर वाराणसी व तेथून गोंदियाला आले होते. त्यांनी लुटलेला माल सुरक्षीत ठेवण्यासाठी १० टक्के कमिशनवर तुमचा माल सुरक्षित ठेवतो व राहण्यासाठी व्यवस्था करतो. अशी ग्वाही गोंदियातील आरोपी जितेंद्र उर्फ भुरू धोटे रा. रामनगर याने दिली होती. कन्हान येथे आरोपी योगेश फुलसिंग यादव (२५) रा. स्वामी विवेकानंद नगर कन्हान हल्ली मु. रामटेके, नितेश उर्फ आर्यन मुन्नेलाल राठौड (२४) रा. बोटेझरी ता. वाराणसी जि. बालाघाट हल्ली मु. कन्हान नागपूर, त्याचे साथीदार पियुष व विनय या चौघांनी दरोडा घालून साहित्य लूटून नेले होते. या संदर्भात कन्हान पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ३९४, ३४, सहकलम ३,२५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करताना नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रामनगरच्या सूर्याटोला परिसरात शक्ती मंदिराजवळील मोतीराम गौतम यांच्या घरी त्यांनी सदर दागिणे लपवून ठेवले होते. कारवाई करणारे पथक त्या ठिकाणी गेले असता आरोपी बंद असलेल्या खोलीत चटईवर झोपले होते. त्या आरोपीना पोलिसांनी खिडकीतून पाहिल्यावर झोपलेल्या तिघांपैकी दोघे कन्हान पोलिसांच्या अभिलेखावर आरोपी म्हणून असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचून त्यात तिघांना पकडले. त्यात योगेश यादव, मितेश राठौड व जितेंद्र उर्फ भुरू मारोती धोटे (३५) रा.रामनगर याच्या समावेश आहे. या प्रकरणात चोरी केलेली रक्कम खर्च झाली. परंतु सोन्याचे दागिणे त्याच्याकडे आढळले. सदर कारवाई नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, राजेंद्र सनोडिया, अजय तिवारी, शैलेश यादव, अमोल कुथे, राजकुमार, सचिन, कमलाकर, उमेश, कार्तिक, गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार, निलेंद्र बैस, विनय शेंडे, पोलीस हवालदार खापेकर यांनी केली आहे. सदर आरोपींना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.१० टक्के कमिशनवर झाला करारकन्हानच्या अमीत ज्वेलर्स मधून साहित्य चोरणाऱ्या आरोपीच्या मागावर नागपूर शहर व नागपूर ग्रामीण पोलीस आहेत. हे आरोपीच्या लक्षात आणले नाही. ते अटक होण्याच्या भितीने रामटेक, वाराणसी व नंतर गोंदिया येथे पळून आले. त्यांना राहण्यासाठी जागा नसल्याने त्याचा साथीदार जितेंद्र उर्फ भुरु मारोती धोटे याने या आरोपीसोबत करार केला. चोरी केलेल्या मालातील १० टक्के मला मिळाले. तर तुमच्या राहण्याची व्यवस्था करून देतो असे म्हटले. त्यावर त्याच्या करार झाला. जितेंद्र ओळखीचे असलेले मनिराम गौतम याच्या घरी दोन दिवसापासून त्यांना ठेवण्याची व्यवस्था केली होती. पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त कन्हानच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक पिस्तुल व चार जिवंत काडतूस आरोपीजवळून मिळाले. २४ हजार रुपये रोख, ९ सोन्याचे पदक, ३ सोन्याचे मनी, १ एकदाणी, सोन्याची साखळी, २ सोन्याचे हार, १० नेकलेस, ६ ठुस्या, २२ पेडंट, ७ पांढऱ्या खड्याचे पेडंट, २२ टॉप्स, १ जोड रिंग, १ सोन्याची साखळी, १ आंगठी, १३ जोडी बागड्या, ५ सोन्याचा माळा, ४ डिझाईन पट्टे, ५ बाजुबंद, १४ सोन्याचा साखळ्या, २ खड्याचा आंगठ्या, १० तोरड्या, ५ जिवत्या व आरोपीजवळील चार मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे.