शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

भाजप सरकारला फक्त भाषण देण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:25 AM

राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : सोनबिहरी येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही. मागील ४ वर्षांपासून भाजप सरकार केवळ भाषण देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम सोनबिहरी येथे १.२८ कोटी रूपयांच्या निधीतून मंजूर सोनबिहरी-बलमाटोला रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.अग्रवाल म्हणाले, क्षेत्रातील कृषी विकासाला प्राधान्य देत बाघ सिंचन प्रकल्पातील कालव्यांचे मोठ्या प्रमाणात खोलीकरण व दुरूस्ती काम करण्यात आले आहे. यंदा शेवटच्या टोकापर्यंत भरपूर सिंचन सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील फक्त गोंदिया तालुक्याला हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेंद्रात एक आयुर्वेदीक चिकीत्सक नियुक्त होणार असून दररोज २० घरांना त्यांना भेट द्यावी लागणार असल्याचे सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभपती चमन बिसेन, विमल नागपुरे, विनिता टेंभरे, मिना चोखांद्रे, कृपाल लिल्हारे, नमिता शहारे, अनिल डोंगरे, जयचंद डहारे, व्यंकटराव मेश्राम, गजेंद्र बोहने, राजकुमार मेश्राम, सिद्धार्थ मेश्राम, रविंद्र लिल्हारे, दुर्गेश लिल्हारे, झाडूदास लिल्हारे, तुलसीबाई बोहने, पुष्पा लिल्हारे, मिरा नागपुरे, मनोहर लिल्हारे, गिरजाशंकर बिरनवार यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालRafale Dealराफेल डील