लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : भरधाव वेगात असलेल्या झायलो या चारचाकी वाहनाने दुचाकी जूर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तिघांतील दोघांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी गोंदियाला पाठविण्यात आले आहे. ही घटना येथील मुख्य चौकात रविवारी (दि.२९) सकाळी १० वाजता दरम्यान घडली.सविस्तर असे की, देवरीकडून आलेल्या झायलो वाहन क्रमांक एमएच ३३-ए ४०२० ने दुचाकी क्रमांक एमएच ३५- एसी ७४३३ ला धडक दिली. रविवारी (दि.२९) सकाळी १० वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत दुचाकीस्वार आकाश सुभाष चुटे याच्या डोक्याला मार लागला असून दिक्षीत यादोराव शिवणकर यांच्या डोक्याला मार लागला असून पाय मोडला आहे. तर तिसऱ्या व्यक्तीला किरकोळ मार लागला.दोघांना देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात नेले असता गंभीर मार असल्याने गोंदियाला पाठविण्यात आले. देवरी पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून चारचाकी वाहन पोलिसांत जमा करण्यात आले आहे.
झायलोची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:28 IST
भरधाव वेगात असलेल्या झायलो या चारचाकी वाहनाने दुचाकी जूर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तिघांतील दोघांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी गोंदियाला पाठविण्यात आले आहे.
झायलोची दुचाकीला धडक
ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी : गोंदियाला उपचारासाठी पाठविले