जावयाला दोन महिन्यांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:35 AM2021-09-17T04:35:28+5:302021-09-17T04:35:28+5:30

गोंदिया : येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी जावयाला दोन महिन्यांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. ही ...

Javaya was sentenced to two months rigorous imprisonment | जावयाला दोन महिन्यांचा सश्रम कारावास

जावयाला दोन महिन्यांचा सश्रम कारावास

Next

गोंदिया : येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी जावयाला दोन महिन्यांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी १६ सप्टेंबर रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश औटी यांनी केली आहे.

डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथे १० जुलै २०१७ रोजी सकाळी ७.३० वाजता गॅस कनेक्शन आणण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आरोपी वसंतराव रामलाल पटले (३४), रा. पांढरी याने आपल्या पत्नीला चाकूने मारून गंभीर जखमी केले. या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेले सासरे मार्कंड राणे, सासू राधिका राणे यांनाही मारहाण केली होती. यासंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी केला होता. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. कैलास खंडेलवाल यांनी फिर्यादीची बाजू मांडली. न्यायालयाने साक्षी पुरावे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कलम ३२४ अंतर्गत आरोपी वसंतराव पटले याला दोन महिन्यांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास ठोठावला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी नाईक पोलीस शिपाई नारायण खांडवाहे यांनी सहकार्य केले.

Web Title: Javaya was sentenced to two months rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.