आठवड्यातील तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडताच लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आवश्यक दक्षता ...

Janata curfew three days a week | आठवड्यातील तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

आठवड्यातील तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

Next
ठळक मुद्देव्यापारी संघाचा निर्णय : प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटींचे पालन होणार




लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडताच लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आवश्यक दक्षता घेऊन कोरोनाशी लढण्यासाठी शहरवासीयांनी कंबर कसली आहे. यासाठी आठवड्यातील ४ दिवस बाजारपेठ सुरु ठेवणे आणि ३ दिवस ‘जनता कर्फ्यू’ लावणे असा निर्णय येथील व्यापारी संघ, वरिष्ठ नागरिक गण आणि काही प्रशासनिक अधिकाऱ्यांनी मिळून घेतला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत शहरवासी सतर्क झाले असून नुकताच त्यांनी शनिवार व रविवार असे २ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ घोषीत केला. त्यानंतर पुन्हा १ दिवस म्हणजे सोमवारपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविला व यानंतर आठवड्यातून ३ दिवस म्हणजे दर शनिवार, रविवार आणि सोमवारी ‘लॉकडाऊन’सह ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय घेतला. या ३ दिवसांच्या ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान नगर पंचायत हद्दीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद राहणार असून शहरवासी विनाकारण घराबाहेर पडणार नाही.
मेडीकल स्टोर्स दवाखाना व जीवनावश्यक वस्तुंसाठीच बाहेर पडणार असून या नियमाचा भंग केल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच शासनाने लागू केलेल्या नियमांचे सुद्धा कठोरतेने पालन केले जाईल असाही निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील जेष्ठ व्यापारी दौलत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या बैठकीत ठाणेदार राजकुमार डुणगे, व्यापारी राजू जैन, विनोद जैन, लखन अग्रवाल, भोजराज टेंभरे, सुरेंद्र असाटी, ओम अग्रवाल, सुनील असाटी, आशू असाटी, राजकुमार रोकडे, लखेंद्र शाह, आनंद पटले, संतोष उजवणे, चीनू भाटीया, राजेंद्र बागडे, महेश असाटी, निश्चल जैन फिजिकल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.
मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या ४ दिवसांत जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत दुकाने सुरु राहतील. याशिवाय जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटीव शर्तींचे कठोरपणे पालन केले जाईल सूर एकमताने निघाला.

१५ जून पर्यंत प्रयोगाचा पहिला टप्पा
शहराला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शहरातील व्यापारी, वरिष्ठ नागरिक व प्रशासनिक अधिकाºयांनी एकत्र येत घेतलेला ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तरिही हा प्रयोग येत्या १५ जूनपर्यंत चालविला जाणार आहे. त्यानंतर परिस्थिती बघून पुन्हा या विषयावर चर्चा करुन पुढे निर्णय घेण्यात येणार आहे.
 

Web Title: Janata curfew three days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.