शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आठ वर्षांपासून रखडले कारागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:46 IST

जिल्हा निर्मितीला २० वर्ष लोटत असताना गोंदिया सारख्या जिल्ह्यात तुरूंग नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या पैशाचाही अपव्यय व मनुष्यबळालाही त्रास होत होता. या प्रकराला पाहून वेळोवेळी शासनाकडे मागणी करण्यात आली.

ठळक मुद्दे३५ कोटींच्या निधीची गरज : अजूनही कारागृह गुलदस्त्यातच, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा निर्मितीला २० वर्ष लोटत असताना गोंदिया सारख्या जिल्ह्यात तुरूंग नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या पैशाचाही अपव्यय व मनुष्यबळालाही त्रास होत होता. या प्रकराला पाहून वेळोवेळी शासनाकडे मागणी करण्यात आली. परंतु शासनाने गोंदियात वर्ग दोनचे कारागृह तयार करण्यास मंजुरी दिली. मात्र आठ वर्षापासून या कारागृहावर नियोजनच होत आहे. परंतु अद्याप कृती करण्यात आली नाही.गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यापेक्षा अधिक गुन्हे घडतात. वर्षाकाठी १२५ ते १५० च्या घरात आरोपींना गोंदियातून भंडारा येथील कारागृहात पाठविले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ लागते. त्यातच वाहन व्यवस्था केली जाते. त्यात लागणारे इंधन ही सर्व परिस्थिती पाहता गोंदिया कारागृह तयार करणे गरजेचे आहे.गोंदियातील आरोपीना भंडारा येथे नेत असताना कुणी आरोपी पसार झाला. किंवा त्याने वाहनातून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर या प्रकारामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना कारवाईस समोरे जावे लागते. आरोपीं पळून गेल्यामुळे अनेक पोलीस शिपाई निलंबित झाले आहेत.हा सर्व त्रास दूर करण्यासाठी गोंदियात कारागृह तयार करणे गरजेचे होते.शासनाने सन २०११-१२ मध्ये गोंदियात वर्ग एकचे कारागृह तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर जागा पाहण्याच्या हालचाली भंडारा जिल्हा कारागृह कार्यालयाकडून झाल्या. परंतु अधीक्षक बदलून गेले व वर्ग एकचा कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव रखडला. भंडारा जिल्हा कारागृह अधीक्षक म्हणून अनुपकुमार कुंभरे नोव्हेंबर २०१५ मध्ये रूजू झाले.त्यानंतर मंत्रालयातील नगररचना कार्यालयाने गोंदियात वर्ग दोनचे कारागृह तयार करण्याची मंजूरी देत त्यासाठी जागा पाहण्याचा आदेश काढला. त्यानुसार कारागृह भंडाराच्या अधिक्षकांनी जागेची पाहणी केली. गोंदियाच्या पोलिस मुख्यालयामागील जागेत कारागृह तयार करण्याचे ठरले. सन २०११-१२ मध्ये वर्ग एकचे कारागृह तयार करण्यास मंजूरी दिली.वर्ग एकच्या कारागृह बांधकामासाठी ५५ कोटी रूपये लागणार असल्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आला होते. परंतु गोंदिया लहान असल्याने वर्ग दोनचे कारागृह तयार करण्याचे नंतर ठरले. वर्ग २ च्या कारागृहाला ३५ कोटी रूपये अंदाजे लागणार आहेत. यासंबधात अंदाजपत्रक आराखडा तयार करून त्याला खर्च किती येणार याचा अहवाल शासनाकडे मागच्या वर्षी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु पाणी कुठे मुरते कुणास ठाऊक अद्याप कारागृहाला शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली नाही. आठ वर्ष मंजूरीला होऊनही निधी दिला नाही.कारागृहासाठी हवी २० एकर जागापोलीस मुख्यालयाच्या मागील भागात ८.७५ हेक्टरमध्ये म्हणजेच २० एकर जमीनीत कारागृह तयार होणार आहे. यातील ४ हेक्टर जमीन शासनाची असून उर्वरीत जमीन शेतकऱ्यांची आहे. शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.३०० आरोपींची क्षमतागोंदियातील आरोपींना या कारागृह ठेवण्यात येणार आहे. या तुरूंगात २५० ते ३०० कैदी ठेवण्याची क्षमता या कारागृहाची राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील आरोपींना भंडाराच्या कारागृह नेण्याचा पोलिसांचा त्रास अजूनही आहे.

टॅग्स :jailतुरुंग