ऑनलाईन लोकमतगोंदिया : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने रामाच्या नवरात्रीनिमित्त ्नरविवारी (दि.१८) शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’चा गजर झाला व शहर दुमदुमून गेले. येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली.मराठी नववर्षाला रविवारपासून (दि.१८) प्रारंभ झाला असून चैत्र नवरात्रोत्सवाला ही प्रारंभ झाला. हे नवरात्र रामाचे नवरात्रही असल्याने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात शोभायात्रा काढली जाते. त्यानुसार यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.‘जय श्रीराम’चा जयघोष करीत निघालेल्या या शोभायात्रेने शहर दुमदुमून गेले होते. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या यात्रेत तरूण तसेच महिलाही प्रभू रामचंद्रांच्या गितांवर नाचत गात असल्याचे दिसून आले.हातात भगवाध्वज घेऊन ‘जय श्री राम’ चा जयघोष करीत कार्यकर्ते शोभायात्रेत सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गांनी निघालेल्या शोभायात्रेचा नेहरू चौकात समारोप करण्यात आला.रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापनाबजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मागील कित्येक वर्षांपासून प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाही येथील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. नऊ दिवसांसाठी स्थापना करण्यात आलेल्या या मुर्तीचे विधिवत पूजन केले जाते. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रभू रामचंद्राच्या मुर्तीच्या स्थापनेने नेहरू चौकात भाविकांची रामचंद्रांच्या दर्शनासाठी गर्दी राहत असून जणू मंदिराचीच अनुभूती येते.
‘जय श्री राम’ चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:23 IST
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने रामाच्या नवरात्रीनिमित्त ्नरविवारी (दि.१८) शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’चा गजर झाला व शहर दुमदुमून गेले.
‘जय श्री राम’ चा गजर
ठळक मुद्देरामाच्या नवरात्रांना प्रारंभ : शहरात निघाली शोभायात्रा