शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह धरणाचा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:01 IST

इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले.

ठळक मुद्देसिंचन विभागाचे डागडुजीकडे दुर्लक्ष भोवले : शेकडो शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले. वृत्त लिहिपर्यंत कालवा फुटलेल्या ठिकाणी संबंधित विभागाद्वारे उपाययोजना करण्यात आली नव्हती.शेतकºयांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी इटियाडोह धरणाची निर्मिती १९४७ मध्ये करण्यात आली. या धरणाच्या पाण्यामुळे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. धरण तर तयार झाले मात्र धरण कालव्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने वारंवार कालवा फुटण्याच्या घटना घडत आहे. धरण निर्मितीला ५१ वर्षे लोटली. मात्र अद्यापही कालव्याला अस्तरीकरण करण्यात आले नाही. अनेक ठिकाणी धरणातील पाण्याच्या झिरपणामुळे पाणी साचते. कालव्यामध्ये मोठी झाडे उगवली. मात्र ते कापण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे अधिकारी सांगतात. कालव्यात वाढलेल्या या झाडांच्या मुळामुळे शेजारील जागा भुसभुसीत होते व त्यामुळे ती वाहून कालव्यात जाते. यामुळे कालवा तर बुजतो. परंतु कालवा फुटण्याचीही भिती असते. या गंभीर बाबीकडे इटियाडोह धरण प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. फुटलेल्या ठिकाणी डागडुजीसाठी पाच मजूर कामावर होते. कालव्यावरील पाळीवर असलेला मुरुम या डागडुजीसाठी वापरण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :DamधरणItiadoh Projectइटियाडोह प्रकल्प