अनाथांना सर्वतोपरी मदत करणे हे एक महान कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:27 PM2018-09-20T23:27:50+5:302018-09-20T23:28:48+5:30

आपल्या राज्याला थोर महान संत, समाज सुधारकांची परंपरा लाभली आहे. आपल्या आदर्शवत समाज सुधारकांनी प्रसंगी आपल्या परिवाराचा त्याग करुन, समाजातील रंजल्या, गांजल्या, वंचितांना सर्वप्रकारच्या मदतीसह मौलीक विचार दिला.

It is a great task to help the orphans in abundance | अनाथांना सर्वतोपरी मदत करणे हे एक महान कार्य

अनाथांना सर्वतोपरी मदत करणे हे एक महान कार्य

googlenewsNext
ठळक मुद्देराजकुमार बडोले : अन्नधान्य, शालेय साहित्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : आपल्या राज्याला थोर महान संत, समाज सुधारकांची परंपरा लाभली आहे. आपल्या आदर्शवत समाज सुधारकांनी प्रसंगी आपल्या परिवाराचा त्याग करुन, समाजातील रंजल्या, गांजल्या, वंचितांना सर्वप्रकारच्या मदतीसह मौलीक विचार दिला. समाज परिवर्तन करण्यासाठी अनेकांना हाल अपेष्ठा सोसाव्या लागल्या. तरी सुद्धा त्यांनी लोककल्याणासाठी आपले अख्खे आयुष्य खर्ची घातले. अनाथांना सर्वतोपरी मदत करुन पालकत्वाची साथ देणे हे एक पुण्याचे व महान कार्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तथा लोकमतचे वार्ताहर अमरचंद ठवरे यांनी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने आयोजित परिसरातील १५ अनाथ मुलांना जीवनोपयोगी वस्तु वाटप व सहा सेवाभावी मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.
या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सरपंच राधेशाम झोळे, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, तालुका भाजपा अध्यक्ष माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, पं.स. गटविकास अधिकारी नारायण जमईवार, पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, वनपरिक्षेत्राधिकारी छगनलाल रहांगडाले, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. सविता बेदरकर, तंमुस अध्यक्ष प्रमोद पाऊलझगडे, सहकारी संस्थांचे अध्यक्ष रत्नाकर बोरकर, सत्कारमूर्ती सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक विठ्ठलराव नेवारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, प्रयोगशिल शेतकरी कुसन झोळे, मोरेश्वर कोसरे, दयाराम महाराज बारसागडे, गणेश मंडळाचे अध्यक्ष जयदेव परशुरामकर उपस्थित होते.
बडोले म्हणाले, थोर समाजसुधारकांचे विज्ञानवादी विचार सर्वांना लाभदायक ठरणारा आहे.त्यागमय जीवन जगणाऱ्या संताच्या अमृत विचारकांनी विविध जाती समुदायामध्ये सलोखा निर्माण होवून गावात एकात्मता, शांतता नांदते. महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकमतचे वार्ताहर व सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून व सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. सविता बेदरकर यांनी सामाजिक कार्याचे दायित्व अंगिकारुन अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्यानी आपण भारावून गेल्याचे सांगितले. तसेच अनाथ कुटुंबांना रोख २५ हजार रुपये व प्रत्येक महिन्याला ५ हजार घरपोच देण्याची व्यवस्था आपण स्व:त करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
याप्रसंगी बाक्टी, निमगाव, मांडोखालटोला, बोंडगावदेवी येथील १५ अनाथ मुलांना तांदूळ १० क्विंटल व तेल आदी साहित्याचे वाटप बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरचंद ठवरे यांनी केले.
सहा मान्यवरांचा सत्कार
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्यनिष्ठांचा सत्कार पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आला. सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक विठ्ठलराव नेवारे, कर्तव्यनिष्ठ डॉ. कुंदन कुलसुंगे, अनाथांची माय सविता बेदरकर, काष्ठशिल्पकार मोरेश्वर कोसरे, प्रयोगशिल शेतकरी कुसन झोळे, दयाराम बारसागडे यांचा समावेश आहे.

Web Title: It is a great task to help the orphans in abundance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.