शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

दोन हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ शक्य

By admin | Updated: May 12, 2017 01:22 IST

आकोट गावाजवळचा भालेसर नाला पूर्णपणे माती, दगडानी बुजला त्यामुळे या नाल्याचे पाणी कोसरा,

निधीची आवश्यकता : अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या भालेसर नाल्याचे काम लोकवर्गणीतून लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा (कोसरा) : आकोट गावाजवळचा भालेसर नाला पूर्णपणे माती, दगडानी बुजला त्यामुळे या नाल्याचे पाणी कोसरा, कोंढा, सेंद्री गावापर्यंत पोहचत नाही म्हणून या गावच्या शेतकऱ्यांना गेल्या ३ वर्षापासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. शेतीला या नाल्याचे पाणी मिळावे यासाठी कोंढा येथील ुउमद्या तरूणांनी लोकवर्गणी व श्रमदानातून हे काम करीत आहेत. सदर काम पूर्ण झाल्यास परिसरातील जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळू शकेल. गोसे प्रकल्पाचा डावा कालवा असलेल्या आकोट गावाजवळ सायफनजवळ भालेसर नाला पूर्णपणे माती झाडे, गवत दगडाने बुजल्याने नाल्याचे पाणी पास होणे बंद झाले होते. डाव्या कालव्याचे पाणी या भालेसरच्या नाल्यात येऊ शकत नव्हते. त्यामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित होते. तीन वर्षांपासून किरण जिभकाटे, ज्ञानेश्वर जिभकाटे, कोसऱ्याचे माजी सरपंच संजय रत्नपारखी, कोंढा येथील ग्रा.पं. सदस्य अमित जिभकाटे यांनी आकोट गावाजवळ असलेल्या भालेसर नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरण करण्यासाठी जेसीबी मशिन भाड्याने आणून काम सुरू केले. त्यासाठी श्रमदानाची मदत देवून या नाल्याचे खोलीकरण केले. यामुळे मोठा आधार शेतकऱ्यांना होणार आहे. या नाल्याचे काम ३ ते ४ कि़मी. अंतर करणे आवश्यक आहे. निधी अपूरा जात असल्याची कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली. भालेसर नाल्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या शेतकऱ्यांनी आपले योगदान देण्याचे आवाहन संजय कावडे व कार्यकर्ते सतत करीत आहेत. जिल्हाधिकारी, भंडारा यांना भालेसर नाल्यांच्या आजुबाजूला असलेल्या शेतीतून पाण्याअभावी धान व इतर पिकांची उत्पादन घेता येत नाही. सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत होती. ही समस्या आकोट, कोसरा, कोंढा येथील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनात आणून दिली. स्वत: आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी या नाल्यास भेट देवून नाल्याचे खोलीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. सदर गाव जलयुक्त शिवार योजनेत येत नसल्याने काम होऊ शकत नाही. असे उत्तर मिळाले. भालेसर नाल्याचे खोलीकरणाच्या कामासाठी ध्येयवेड्या कोंढा येथील संजय कावडे यांनी संबधित विभागाला निवेदन दिले. महसूल अधिकाऱ्यांनी यास भेट दिली. पण नाल्याच्या खोलीकरणाचे नियोजन करू शकले नाही. सायफन दुरूस्ती होणे आवश्यक महाराष्ट्र ग्रामीण रोजगारहमी योजनेअंतर्गत नाला खोलीकरण, सरळीकरण, रूंदीकरणाचे काम होत आहेत. भालेसर नाला रूंदीकरण, खोलीकरण व सरळीकरणाचे काम ग्राम पंचायत आकोट, कोसरा व कोंढा यांनी घेणे आवश्यक ठरत आहे. पावसाळ्यात या ना?यातील पाणी ठप्प होते म्हणून शेतातील पाण्याची निकासी होत नाही. चिचाळपासून भालेसर नाला पूर्णपणे बुजला आहे. सायफन असलेल्या ठिकाणी सध्या कालव्याचे पाणी अंडरग्राऊंड दुसऱ्या बाजुस जाते. पण तिथे ६ पैकी एक गेटचे ग्रील पूर्ण करणे असल्याने कालव्यातील नंबर १ च्या गेटमधून पाण्यासोबत कचरा, झाडे, पालापाचोळा वाहून जात असतो. त्यामुळे भालेसरच्या नाल्यात पाणी गोळा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. सायफनच्या गेटचे काम करण्याकडे डावा कालवा धरण विभाग वाही यांचे दुर्लक्ष होत आहे. गोसे प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्यात बाराही महिने सतत पाणी सुरू झाले नाही तर सायफनच्या गेटला असलेली जाळी तुटलेली आहे. ते दुरूस्त होणे आवश्यक आहे. ते झाल्यास हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळू शकते. आकोट, निरगुडी, कोसरा, कोंढा, सेंद्री येथील शेतकऱ्यांना २ हजार हेक्टर शेतीला वरदान ठरणारा भालेसर नाला आहे. शेतकरी कल्याण साधनाऱ्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्यास याचे काम पूर्णत्वास जाऊ शकते. ध्येयवेड्या तरूणानी नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले ते पूर्णत्वास गेले पाहिजेत, अशी अपेक्षा गावकरी करीत आहेत.