शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

४५ वर्षांपासून रखडले ८१८ हेक्टरचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:33 AM

तिरोडा तालुक्यातील १५ गावांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे काम मागील ४५ वर्षांपासून अद्यापही मार्गी लागले नाही. परिणामी या परिसरातील ८१८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यापासून वंचित आहे.

ठळक मुद्देनिमगाव प्रकल्प : १५ गावातील शेतकरी प्रतीक्षेत,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील १५ गावांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे काम मागील ४५ वर्षांपासून अद्यापही मार्गी लागले नाही. परिणामी या परिसरातील ८१८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यापासून वंचित आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध असताना सुध्दा या पंधरा गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.तिरोडा तालुक्यातील निमगाव गावाजवळील आंबेनाला नाल्यावर निमगाव लघू प्रकल्पाला १९७३ मध्ये शासनाने मंजुरी दिली. या जलाशयातील पाणी १५० कि.मी.लांबीच्या पूरक कालव्याव्दारे बोदलकसा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तिरोडा तालुक्यातील १५ गावातील ८१८ हेक्टर क्षेत्राला सिंचन होणार होते. बोदलकसा मध्यम प्रकल्पाचे सिंचन योग्य क्षेत्र ५ हजार ३७१ हेक्टर असून यापैकी करारनाम्याप्रमाणे ४ हजार ११५ हेक्टरला या प्रकल्पाव्दारे सिंचनाची सोय केली जाते. तर उर्वरित ११७६ हेक्टरला निमगाव लघू सिंचन प्रकल्पाव्दारे सिंचनाची सोय उपलब्ध दिली जाणार होती. या प्रकल्पाच्या कामाकरिता २३ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता सुध्दा मिळाली आहे.प्रकल्पाच्या घळभरणीचे कामे वगळता दोन्ही तिरावरील मातीकाम रोहयो अंतर्गत ८० टक्के पूर्ण झाले आहे. तर पूरक कालव्याचे ४० टक्के आणि सांडवा व नालीचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र या प्रकल्पासाठी वनविभागाच्या २.६८ हेक्टर आर जमिनीची आवश्यकता आहे. पण, यावर अद्यापही तोडगा न निघाल्याने निमगाव प्रकल्पाचे काम दिवसेंदिवस रखडत चालले आहे. या प्रकल्पात वन्यजीव विभागाची काही जमीन येत असल्याने प्रकल्पाच्या कामात बाधा निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे सिंचन विभागाने वनविभागाकडे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.त्यानंतर वनविभागाने पर्यायी वनीकरणाकरिता १३ कोटी १८ लाख रुपयांची मागणी केली होती. ती रक्कम सुध्दा वनविभागाकडे भरण्यात आली. त्यानंतर गोंदिया उपवनसंरक्षक कार्यालयाकडून २०१५-१६ मध्ये पुन्हा १० कोटी ४४ लाख ८५ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. त्यापैकी सिंचन विभागाने १ कोटी ३१ लाख रुपयांचा भरणा सुध्दा वनविभागाकडे केला. मात्र त्यानंतरही वनविभागाची मंजुरी न मिळाल्याने निमगाव प्रकल्पाचे काम रखडत चालले आहे. १९७३ मध्ये मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाचे काम ४५ वर्षे लोटूनही मार्गी न लागल्याने १५ गावातील शेतकरी सिंचनपासून वंचित आहे. परिणामी शेतकऱ्यांना पाण्याअभावी दरवर्षी नुकसान सहन करावे लागत आहे.प्रकल्पातील मुख्य अडचणनिमगाव प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी १४१.६२ हेक्टर वनजमिन वळती करण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने २३ आॅगस्ट २००६ मध्ये तत्वत: मंजुरी दिली. त्यानंतर वनसंपादनाकरिता केंद्र शासनाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी २२ मे २०१७ प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र त्याला अद्यापही मंजुरी न मिळाल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे.ही गावे सिंचनापासून वंचितनिमगाव प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून बोदलकसा जलाशयात सोडण्यात येणार आहे. यामुळे निमगाव, भिवापूर, मेंदीपर, बरबसपुरा, काचेवानी, बेरडीपार, जमुनिया, गुमाधावडा, खमारी, खैरबोडी, चुरडी, पालडोंगरी, चिरेखनी, बेलाटी खुर्द, बेलाटी बु., मुंडीपार या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार होती. मात्र प्रकल्पाचे काम रखडल्याने त्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.प्रकल्प मार्गी न लागल्यास जेलभरोतिरोडा तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया निमगाव प्रकल्पाचे काम ४५ वर्षे लोटूनही पूर्ण झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असून त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याची गरज होती. मात्र त्यांचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील अडचणी दूर करुन तो लवकरात लवकर मार्गी न लावल्यास या विरोधात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सचिव चनीराम मेश्राम यांनी दिला आहे.

टॅग्स :Damधरण