शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

सागवान तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी व स.व.व्य. समिती नवाटोलाच्या सदस्यांनी हाजराफॉल परिसरात रात्रीची गस्त लावली होती. या परिसरात सागवान चोरी करणारी टोळी असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्या अनुषंगाने सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी ए.व्ही. इलमकर, स.व.व्य. समिती नवाटोलाचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे व सालेकसाचे क्षेत्र साहाय्यक एम.एम. गजभिये यांची विशेष चमू तयार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा  : सहायक वन व्यवस्थापन समिती नवाटोला (हाजराफॉल) व वनविभाग सालेकसा यांच्या संयुक्त गस्तीच्या वेळी मध्य प्रदेशातील सागवान तस्करांच्या टोळीला शासकीय वनातून अवैध वृक्षतोड करताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी व स.व.व्य. समिती नवाटोलाच्या सदस्यांनी हाजराफॉल परिसरात रात्रीची गस्त लावली होती. या परिसरात सागवान चोरी करणारी टोळी असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्या अनुषंगाने सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी ए.व्ही. इलमकर, स.व.व्य. समिती नवाटोलाचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे व सालेकसाचे क्षेत्र साहाय्यक एम.एम. गजभिये यांची विशेष चमू तयार केली. ही चमू नवाटोला परिसरात रात्री गस्तीवर असताना त्यांना दरेकसा घाटाजवळ कक्ष क्रमांक ८१८ अवर्गीकृत वनामध्ये हात आऱ्याचा आवाज आला. या आवाजाच्या दिशेने गेल्यावर त्यांना आरोपी जगन प्रताप वसोने, जोहन प्रताप वसोने, पुनाराम तेजलाल लिल्हारे यांच्यामध्ये चकमक झाली. तर नीलेश उपराडे, प्रमोद (सर्व रा. टेकेपार, ता. लांजी, जि. बालाघाट) (मध्य प्रदेश रहिवासी) हात आऱ्याच्या साहाय्याने सागवान लाकूड कापताना आढळले. या तस्करांच्या टोळीशी वनकर्मचारी व समिती सदस्य यांची चकमक झाली. या चकमकीमध्ये आरोपी क्र. १ ते ३ यांना रंगेहाथ पकडण्यात यश आले व आरोपी क्र. ४ व ५ फरार झाले. आरोपींच्या नावे वन गुन्हा ०४१९१/१०४७३१/२०२१ जारी करण्यात आला. आरोपींकडून हातआरा, कुऱ्हाड, रस्सी व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ४७१९१ रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले.

मध्य प्रदेश वन विभागदेखील होता या टोळीच्या शोधात - २१ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना प्रथम दंडाधिकारी न्यायालय, आमगाव यांच्या समक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपींना दोन दिवस वन कोठडीमध्ये पुढील तपासाकरिता ठेवले आहे. ही टोळी मध्य प्रदेशातदेखील सक्रिय असून त्यांच्याविरुद्ध म.प्र. वनविभागात वन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तेदेखील या टोळीच्या शोधात होते. हाजराफॉल पर्यटनस्थळी कार्यरत असलेल्या नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आरोपींना पकडण्यात वन विभागाला सहकार्य केले.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग