शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 19:47 IST

देवरी येथील महावीर राइस मिल व नवाटोलाच्या पंचमवार यांच्या घरून रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या एका सदस्याला अटक करण्यात आली.

गोंदिया :

देवरी येथील महावीर राइस मिल व नवाटोलाच्या पंचमवार यांच्या घरून रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. ही कारवाई २८ मार्च रोजी पहाटे १.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेने केली. प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर (३०), रा. देवघर मोहल्ला, खपराभाट, बालोद छत्तीसगड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२६ मार्चच्या पहाटे ५ वाजता देवरीच्या महावीर राइस मिलच्या दाराचे कुलूप तोडून ३ अनोळखी चोरट्यांनी मिलमधील ४ लाख ३८ हजार रुपये रोख पळविला होता. त्याच दिवशी नवाटोला येथील कृष्णा चंद्रया पंचमवार (६०) यांच्या घराचे कुलूप तोडून त्याच ३ अनोळखी चोरट्यांनी एक तोळे सोन्याची साखळी व रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. तसेच कोहमारा येथील सहकारी सोसायटीचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला होता. या तिन्ही गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी घेतली. गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या चोरीचे प्रमाण पाहता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी दोन वेगवेगळे पथक तयार करून आरोपी रवाना केले होते. यातील आरोपी प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर (३०) याने आरोपी नरेश महिलांगे, रणजित यांच्या मदतीने चोरी केली होती. यातील तीन सदस्यांपैकी एका सदस्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलिस हवालदार तुलसीदास लुटे, राजू मिश्रा, इंद्रजित बिसेन, महेश मेहर, चेतन पटले, प्रभाकर पालांदूरकर, दीक्षित दमाहे, संजय मारवाडे, विनोद बरय्या, मोहन शेंडे, धनंजय शेंडे, हंसराज भांडारकर, अजय रहांगडाले, मुरली पांडे, विनोद गौतम, महिला पोलिस शिपाई कुमुद येरणे यांनी केली.

७० ठिकाणचे तपासले सीसीटीव्ही फुटेजस्थानिक गुन्हे शाखेचे दोन्ही पथक हे देवरी येथील दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळ ते डोंगरगडपर्यंतच्या ६० ते ७० ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. तांत्रिक विश्लेषणावरून अज्ञात आरोपींचा शोध घेतला.गुन्ह्यासाठी वापरलेली कार केली जप्तआरोपी प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर हा डोंगरगड, (छत्तीसगड) परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पथकाने २८ मार्च रोजी १:३० वाजता गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. आरोपी प्रदीपकडून ४७ हजार रुपये रोख रक्कम व कार सीजी ०५ यू ४३७३ किंमत ३ लाख रुपये असा एकूण किंमत ३ लाख ४७ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींवर तीन जिल्ह्यांत गुन्हे दाखलआंतरराज्यीय घरफोडीचे आरोपी प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर (३०), नरेश महिलांगे व रणजित या तिघांवर नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून गोंदिया जिल्ह्यातील इतर गुन्हेसुद्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे.