दूध कमी दराने खरेदी केल्याबाबत चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:00 PM2018-04-26T22:00:45+5:302018-04-26T22:00:45+5:30

जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत दुग्ध उत्पादकांना प्रत्येक लिटरमागे ५ रूपये ५० पैसे कमी दिले जात असल्याची तक्रार सहा सहकारी संस्थानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Inquire about the purchase of milk at lower rate | दूध कमी दराने खरेदी केल्याबाबत चौकशी सुरू

दूध कमी दराने खरेदी केल्याबाबत चौकशी सुरू

Next
ठळक मुद्देकारवाईसाठी प्रकरण वरिष्ठांकडे : दुुग्ध उत्पादक संघाने आर्थिक अडचण दाखवून कमी केले दर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत दुग्ध उत्पादकांना प्रत्येक लिटरमागे ५ रूपये ५० पैसे कमी दिले जात असल्याची तक्रार सहा सहकारी संस्थानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्याबाबतच्या तक्रारीची चौकशी विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांनी सुरू केल्याची माहिती जल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात शासन, सहकारी व खाजगी दुग्ध डेअरीमार्फत जवळपास ४९ हजार लिटर दुुधाचे दररोज संकलन करण्यात येते. त्यापैकी गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत एकूण ७८ दुग्ध उत्पादक सहकारी संस्था ८ हजार लिटर दूध दररोज संकलन करतात. हे संकलीत केलेले दूध शासकीय दूध योजना गोंदिया व शासकीय दूध शितकरण केंद्र कोहमारा येथे पुरवठा करण्यात येते. शासनाने गाईच्या दुधाकरीता ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतीच्या दुधाचा दर २७ रु पये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाकरीता ६ फॅट व ९ एस.एन.एफ. गुणप्रतीच्या दुधाकरीता ३६ रु पये प्रति लिटर दर निश्चित केला आहे. जिल्हा दुग्ध संघामार्फत संकलीत होत असलेले दूूध शासन स्वीकारत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार दूध उत्पादक सहकारी संस्थांना दूधाचे दर देणे गोंदिया जिल्हा दूध संघास बंधनकारक आहे. परंतु गोंदिया दूध संघामार्फत दूध उत्पादक सहकारी संस्थांना शासनाने निश्चित केलेले प्रति लिटर दर २७ रूपये न देता २२ रूपये प्रती लिटर दूधाचे दर दिले जात असल्याची बाब जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या लक्षात आली. दुग्ध उत्पादकांनी यासंदर्भात ३० जानेवारी २०१८ रोजी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार गोंदिया जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघास दूध उत्पादकांना कमी दूध दर देत असल्याबाबतचा खुलासा सादर करा असे पत्र संघाला देण्यात आले होते.
गोंदिया दुग्ध संघाने दिलेल्या माहितीत शासनाला पुरवठा केल्यानंतर उरलेले दूध महानंदला २० रु पये प्रति लिटर दराने विक्री केले आहे. त्यामुळे संघाला आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगूने २१ डिसेंबर २०१७ पासून ३ रूपये प्रति लिटर आणि २४ जानेवारी २०१८ पासून २ रु पये प्रति लिटर दर कमी करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
संघाने दिलेली माहिती योग्य वाटत नसल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघावर कारवाई करण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी हे प्रकरण विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांच्याकडे पाठविले आहे. शासनाने निश्चित केलेले प्रति लिटर दूधाचे दर दूध उत्पादकांना गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी संघ देत नसल्याचे १० डिसेंबर २०१७ रोजीच विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांना सांगितले. त्यांनी या संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावले होते. दूध संघ आर्थिक अडचणीत व तोट्यात असल्यामुळे २५ जानेवारी २०१८ रोजी निबंधकांनी कलम ७९ अ (३) अंतर्गत बजावण्यात आलेल्या नोटीसवर दोन महिन्याची स्थिगती दिली होती. सदर स्थगितीची कालमर्यादा संपल्यावर गोंदिया जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या सर्व पदाधिकारी आणि संचालकांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ (३) अन्वये ९ एप्रिल २०१८ रोजी नोटीस काढून १९ एिप्रल रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली आहे.
 

Web Title: Inquire about the purchase of milk at lower rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध