जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:15+5:30

कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यातून ओसरली असून, जिल्हा सध्या मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, मधेमधे काही प्रमाणात बाधित आढळून येत असल्याचे दिसते. यामुळेच कोरोना पूर्णपणे गेला नसल्याची प्रचिती येत राहते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याने आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी फक्त १०-२० चाचण्याच केल्या जात असल्याचेही दिसले.

Increased number of corona tests in the district | जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत केली वाढ

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत केली वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया  :  जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. मात्र, देशातील काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता चाचण्यांची संख्या वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. अशात मध्यंतरी शंभराच्या आत असलेली चाचण्यांची संख्या आता वाढविण्यात आल्याचे दिसत आहे. शनिवारी (दि. १४) जिल्ह्यात १३२ चाचण्या करण्यात आल्या. मात्र, त्यात आता रॅपीड अँटिजन चाचण्यांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. 
कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यातून ओसरली असून, जिल्हा सध्या मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, मधेमधे काही प्रमाणात बाधित आढळून येत असल्याचे दिसते. यामुळेच कोरोना पूर्णपणे गेला नसल्याची प्रचिती येत राहते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याने आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी फक्त १०-२० चाचण्याच केल्या जात असल्याचेही दिसले. तसेच बहुतांश वेळा शंभराच्या आतच चाचण्या सुरू आहेत. असे असतानाच देशातील काही भागात कोरोना पुन्हा आपले पाय पसरत असल्याने शासनाने चाचण्याची संख्या वाढवून वेळीच निदान करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच की काय, शनिवारी चाचण्यांची संख्या १३२ दिसून आली. मात्र, यामध्ये फक्त ११ आरटी-पीसीआर असून, १२१ रॅपीड अँटिजन चाचण्या होत्या. 

जिल्ह्यात आतापर्यंत ५,१७,०६० चाचण्या 
- मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून सातत्याने कोरोना चाचण्या सुरू आहेत. सुरुवातीला फक्त आरटी-पीसीआर हीच एकमात्र चाचणी केली जात होती. मात्र, त्यानंतर रॅपीड अँटिजन चाचणीला परवानगी मिळाली व त्यासुद्धा सुरू झाल्या. आतापर्यंत जिल्ह्यात ५,१७,०६० चाचण्या करण्यात आल्या असून, यामध्ये २,७५,७४३ आरटी-पीसीआर, तर २,४१,३१७ रॅपीड अँटिजन चाचण्या आहेत. एवढ्या चाचण्यांनंतर जिल्ह्यात ४६,२१६ बाधित आढळून आले आहेत.

 

Web Title: Increased number of corona tests in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.