शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीनंतर वाढला उमेदवारीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. ओबीसी जागा सर्वसाधारण करून या जागांसाठी ५० महिला आरक्षणाकरिता गुरुवारी (दि.२३) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात काही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी उमेदवारी देण्याचा पेच पक्षासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर पक्ष कोणता रामबाण इलाज शोधते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १८ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली, तर २९ जानेवारीपासून या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र, आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

उमेदवारीकडे लक्ष - ३० जागांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित केले होते; पण आरक्षणामुळे त्यात थोडाफार बदल झाला असून, कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष आहे.

जागा सर्वसाधारण, पण उमेदवार ओबीसीच - स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले असले तरी या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतला होता. त्याच निर्णयानुसार या जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी दिली जात आहे. मात्र, यासाठी इच्छुकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे अनेकांची नाराजी पक्षाला सहन करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी २९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ४ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदreservationआरक्षण