शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

गोंदिया : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता जबाबदारीने कामे करून जास्तीत जास्त टेस्टिंग ...

गोंदिया : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता जबाबदारीने कामे करून जास्तीत जास्त टेस्टिंग वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कोविड संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. आरटी-पीसीआर व रॅपिड अँटीजन चाचण्यांवर भर देण्यात यावा. बाधित रुग्णांची टेस्ट २४ तासात येईल. असे नियोजन करावे. बाधित रुग्णांबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

.....

प्रलंबित आरटीपीसीआर चाचण्या शून्यावर आणा

आरटीपीसीआर तपासणीच्या प्रलंबित केसेस आहेत. त्या प्रलंबित केसेस येत्या सोमवारपर्यंत झीरो झाल्या पाहिजे, याबाबत नियोजन करावे. रुग्णांच्या सेवेसाठी प्रत्येक रुग्णालयात ॲम्बुलन्स असायला पाहिजे. जिल्ह्यात १० हजार रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट येणार आहेत त्याचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत, त्याची अडचण भासणार नाही. कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाला पूर्व परवानगीशिवाय बाहेर काढता येणार नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बाधित व्यक्तीच्या बॉडीचे प्रोटोकॉल पाळण्यात यावे. कोरोना बाधित रुग्णांबाबत यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे. ऑक्सिजनचा टँकर लवकरच येणार आहे त्याचे नियोजन करण्यास सांगितले.

.....

मनुष्यबळात वाढ करा

जाहिरात काढून रुग्णालयात मनुष्यबळ वाढविण्यात यावे. जिल्ह्यत ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड

कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून रुग्णांची गैरसोय होणार नाही व कोणत्याही रुग्णाची तक्रार येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. कोविन ॲपवर कार्यशाळा घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.