शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

धानाच्या दोन टक्के तुटीची भरपाई करणार करणावाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:21 PM

शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची खरेदी संस्थामार्फत गोदामात साठवणूक केली जाते. मात्र गोदामात धान अधिक काळ साठवून ठेवला जातो, परिणामी धानात तूट होते.

ठळक मुद्देखरेदी संस्थाना मिळणार दिलासा : शासकीय धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची खरेदी संस्थामार्फत गोदामात साठवणूक केली जाते. मात्र गोदामात धान अधिक काळ साठवून ठेवला जातो, परिणामी धानात तूट होते. याचा भुर्दंड संस्थावर बसतो. त्यामुळे धानातील तूट २ टक्के पर्यंत मंजूर करावी, अशी मागणी धान खरेदी संस्थानी मागील तीन चार वर्षांपासून लावून धरली होती.याची दखल घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी २ टक्केपर्यंत तूट भरुन काढण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही संस्थांना दिली. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी खरेदी संस्थाच्या मागणीची दखल नुकतीच मुंबई मंत्रालयात त्यांच्या दालनात या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्यासोबत धान खरेदी संस्थांच्या संचालकांची बैठक घेतली. यात धानाची तूट २ टक्के पर्यंत भरुन काढण्यात येईल अशी ग्वाही बापट यांनी दिली. त्यामुळे राज्यातील धान खरेदी करणाऱ्या संस्थाना दिलासा मिळणार आहे. यामुळे मागील तीन चार वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. सन २००८ ते २०१२ या कालावधी खरेदी करण्यात आलेला धान अनेक महिने गोदामात पडून होता. त्यामुळे धानात मोठ्या प्रमाणात घट आली. परिणामी धान खरेदी करणाºया संस्थाना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.त्यामुळे या कालावधीत गोदामात साठवून ठेवलेल्या धानाची २ टक्के तूट मंजूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही बापट यांनी दिलीतसेच २०१५ ते २०१८ पर्यंतचे थकीत गोदाम भाडेही देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. गोदामात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ धान राहिल्यास त्यांना एक टक्के घट देण्याचाही शासनाचा विचार आहे.पूर्व विदर्भात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असून शासकीय धान खरेदी केंद्र व खरेदी संस्थाची संख्या सुद्धा अधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती