जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:07 PM2019-06-17T23:07:37+5:302019-06-17T23:07:50+5:30

गोंदिया जिल्ह्याचे वैभव आणि हळूहळू सारसांचा जिल्हा अशी ओळख निर्माण होत असताना यंदा जिल्ह्यातील सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ही ओळख अधिक प्रभावीपणे होण्यास मदत झाली आहे. सेवा संस्था आणि शेतकऱ्यांच्या मदतीने सारस संवर्धनासाठी मागील पाच सहा वर्षांपासून करण्यात येत असलेले प्रयत्न सुध्दा यामुळे फळाला आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

Increase in the number of storks in the district | जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ

Next
ठळक मुद्देसारस गणना : २२ पथकांचा समावेश, चार जिल्ह्यात झाली गणना, मागील वर्षीच्या तुलनेत ८ ने वाढली संख्या, निसर्गप्रेमींमध्ये आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याचे वैभव आणि हळूहळू सारसांचा जिल्हा अशी ओळख निर्माण होत असताना यंदा जिल्ह्यातील सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ही ओळख अधिक प्रभावीपणे होण्यास मदत झाली आहे. सेवा संस्था आणि शेतकऱ्यांच्या मदतीने सारस संवर्धनासाठी मागील पाच सहा वर्षांपासून करण्यात येत असलेले प्रयत्न सुध्दा यामुळे फळाला आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
सेवा संस्था, शेतकरी, वन्यजीव विभाग यांच्या नेतृत्त्वात ८ ते १४ जून दरम्यान गोंदिया, बालाघाट, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सारस गणना करण्यात आली. एकूण २२ पथकांनी केलेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्यात ४२, बालाघाट जिल्ह्यात ५४, भंडारा ३, चंद्रपूर जिल्ह्यात सारस आढळल्याची माहिती सेवा संस्थेचे सावन बहेकार यांनी दिली. यामुळे आता गोंदिया व बालाघाट या सारस स्केपमध्ये सारसांची संख्या ९६ झाली आहे.
सेवा संस्थेच्या सदस्यांनी वर्षभर सारस पक्ष्यांचे अधिवास असणारे ठिकाण, प्रजनन अधिवास, भोजन आणि त्यांच्या भ्रमण स्थळांचा अभ्यास केला.
त्यानंतर ८ ते १४ जून दरम्यान २२ पथकांच्या मदतीने पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत सारस गणना करण्यात आली. त्यात सारस पक्षांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे आढळले. प्रेमाचे प्रतीक असलेले सारस पक्षी हे दुर्मीळ समजले जातात. महाराष्टÑात या पक्ष्यांची संख्या फार कमी आहे. मात्र धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील पाच सहा वर्षांपासून सारस संवर्धनासाठी ‘सारस जोडो’ जनजागृती अभियान राबविले जात आहे.
त्यामुळे सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्यास शेतकऱ्यांसह गावकºयांची सुध्दा मदत मिळत आहे. धान हे सारस पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याने गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्याचा परिसरात सारस पक्ष्यांचा सर्वाधिक अधिवास आढळतो. या परिसरातील वातावरण सुध्दा सारस पक्ष्यांना अनुकुल असल्याने महाराष्टÑात सर्वाधिक सारस याच भागात आढळतात. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी प्रयत्नरत असलेल्या सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार आणि त्यांच्या संस्थेचे सदस्य सारस संवर्धनासाठी परिश्रम घेत आहे. त्याचेच फलित म्हणजे यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. सारस पक्ष्यांचा ज्या ठिकाणी अधिवास आहे.त्या ठिकाणच्या लोकांना सारसाचे महत्त्व सांगितले.
बालाघाट जिल्ह्यातही सारस संरक्षण व संवर्धनाचे काम स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडून शेतकºयांच्या मदतीने केले जात आहे. सारस गणनेसाठी गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, बालाघाटचे वन मंडळ अधिकारी देवप्रसाद, सहायक वनसंरक्षक विकास माहोरे,सुशिल नांदवते आणि वन विभागाचे पी.बी.चन्ने,शेषराव आकरे,अरुण साबळे यांनी सहकार्य केले.

सारस संवर्धनासाठी प्रशासनाच्या पुढाकाराची गरज
संपूर्ण महाराष्टÑात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या अधिक आहे. स्थानिक पर्यावरण प्रेमी संस्था आणि वन, वन्यजीव विभागाच्या मदतीने सारस संवर्धनासाठी केली जात असलेली जनजागृती त्यास कारणीभूत आहे. अशीच जनजागृती राज्यात सर्वत्र करुन सारस संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घेवून उपाय योजना करण्याची गरज आहे.

सारस गणनेत यांचा सहभाग
सारस गणनेमध्ये भरत जसानी, चेतन जसानी, सावन बहेकार, अंकित ठाकूर, संजय आकरे,अशोक पडोळे, दुश्यंत रेंभे,अश्विनकुमार पटले, पिंटू वंजारी, रुचीर देशमुख, मुकुंद धुर्वे, शशांक लाडेकर, कन्हया उदापूरे, बबलू चुटे, बंटी शर्मा, नदीम खान, पवन सोयाम, रिशील डहाके, सलिम शेख, दीपक मुंदडा, राकेश डोये, दानवीर मस्करे, कमलेश कामडे, जैपाल ठाकूर, जलाराम बुधेवार, प्रशांत मेंढे, प्रवीण मेंढे, विकास फरकुंडे, डॉ.तांडेकर, मनिष कुर्वे, संदीप तुरकर, शेखबहादूर कटरे, धमेंद्र बिसेन, राहुल भावे, रतिराम क्षीरसागर, ललित भांडारकर, निशांत देशमुख, सिंकदर मिश्रा, राकेश खंडेलवाल, पप्पु बिसेन, गौरव मटाले, नखाते, डिलेश कुसराम, वसंत बोपचे यांचा समावेश होता.

Web Title: Increase in the number of storks in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.