जिल्ह्यात कोविड सेंटरची संख्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:27 AM2021-04-11T04:27:53+5:302021-04-11T04:27:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सडक अर्जुनी : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या बघता ...

Increase the number of covid centers in the district | जिल्ह्यात कोविड सेंटरची संख्या वाढवा

जिल्ह्यात कोविड सेंटरची संख्या वाढवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सडक अर्जुनी : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या बघता बेड उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णांची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.

जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावात रूग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यात गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, वेळप्रसंगी जीव गमवावा लागत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोविड तपासणी केंद्र वाढवावीत तसेच कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांची प्राधान्याने तपासणी करावी व कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. कोरोनासंदर्भात तालुका स्तरावरील संपर्क केंद्र गतिमान करण्यासंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत कोविड केअर सेंटरची संख्या वाढवावी, अशी मागणी बडोले यांनी केली आहे.

Web Title: Increase the number of covid centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.