शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कापूर, निलगिरी तेलाच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:30 IST

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. तर पन्नासावर संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाावासीयांनी या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे.

ठळक मुद्दे नागरिकांनी घेतली स्वाईन फ्लूची धास्ती : उपाययोजनांचा अभाव

हितेश रहांगडाले।लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. तर पन्नासावर संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाावासीयांनी या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे. आरोग्य प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांनीच स्वाईन फ्ल्यूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कापूर व निलगिरी तेलाचा वापर सुरू केला आहे.आठ दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यातील तीन जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जनता सावध झाली आहे. स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्या जाणाºया निलगिरी तेलाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.याबाबद निलगिरी तेलच्या होलसेल विक्रेत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, निलगिरी तेलाची महिन्याला साधारणत: १५ हजार बॉटल्सची मागणी असायची. आता ही मागणी तिपटीने वाढून ४५ हजार बॉटल्सवर पोहचली आहे. एवढेच नव्हे तर साधारणत: १६ रुपये किंमतीला येणारी पाच मिली निलगिरी तेलाची किंमत वाढून २५ रुपये करण्यात आली. शिवाय छोट्या बॉटलची मागणी वाढल्यामुळे औषधी दुकानात त्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यांना ५० ते १०० रुपये किमंतीचा निलगिरी तेल खरेदी करावे लागत आहे.स्वाईन फ्लू प्रतिबंधक समजल्या जाणाºया कापूरच्या मागणीत वाढ झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचारी, कामावरील मजूरवर्गही सोबत कापूर बाळगत आहेत. परिणामी ५०० रुपये किलोने मिळणाºया कापराची किंमत ७०० रुपयांपेक्षा अधिक झाल्याची माहिती आहे.कापराची मागणी वाढण्यास नवरात्रोत्सव हे एक कारण असले तरी स्वाईन फ्लूच्या भीतीनेही कापूर विक्रीत वाढ झाली आहे. सोबत विलायचीसुद्धा नेली जात आहे.‘तो’ रुग्ण स्वाईन फ्लूचा नाहीतिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील नयन नंदकिशोर राघोर्ते (२) हा रुग्ण संशयीत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. परंतु डॉक्टरांनी सर्व तपासण्या करुन सदर रुग्ण स्वाईन फ्लूचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो सध्या स्वस्थ असून रुग्णालयातून त्याला सुट्टी देण्यात आली आहे.आरोग्य प्रशासनाची बघ्याची भूमिकाजिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार वाढत असताना अद्यापही व्यापक स्वरुपात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरूवात केलेली नाही. लोकांमध्ये जनजागृती करण्याकडेसुध्दा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.आवाहन करुन झटकले हातस्वाईन फ्ल्यूचा प्रसार नेमका कशामुळे होते. तो होवू नये यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, यासंबंधीचे चार ओळींचे पत्रक काढून आरोग्य विभागाने हात झटकले आहे. अद्यापही ग्रामीण भागात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप सुरू केले नसून आरोग्यसेवकसुध्दा भटकत नसल्याचे चित्र आहे.शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावलीतिरोडा तालुक्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण दगावल्यामुळे सर्वत्र सावधगिरीचे वातावरण आहे. शाळांमध्ये दररोज असणारी विद्यार्थी उपस्थिती रोडावल्याची स्थिती आहे. स्वाईन फ्लू एक संसर्गजन्य व गर्दीच्या ठिकाणी पसरणारे रोग असल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांनी तोंडावर रुमाल ठेऊन अध्ययन अध्यापन कार्य केले. विशेष म्हणजे सर्दी, ताप, घसा दुखणे ही स्वाईन फ्लूची मूळ लक्षणे असल्यामुळे असा त्रास असणाºया विद्यार्थ्यांना शाळेतून मधातच सुट्टी देऊन घरी राहणे व औषधोपचाराचा सल्ला दिला जात असल्याची माहिती आहे.