विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे विविध माध्यम कार्यांवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:38+5:30

शिक्षण विभाग विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. यात जिओटीव्ही प्लॅटफॉर्म इयत्ता १२ वि विज्ञान, इयत्ता १० वी इंग्रजी, मराठी या दोन्ही माध्यमांसाठी ३ ज्ञान गंगा चॅनल, जिओ सावन या रेडीओच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Implementing various means of education for students | विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे विविध माध्यम कार्यांवित

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे विविध माध्यम कार्यांवित

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून नवनवे प्रयोग : चॅनल्स व अ‍ॅपद्वारे घरबसल्या शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये म्हणून शासनाच्या शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्तवतीने सातत्याने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात येत आहेत. शैक्षणिक दिनदर्शिका विकसीत करण्यात आली असून या आधारे दीक्षा अ‍ॅपच्या सहायाने विद्यार्थी स्वयंअभ्यास करु शकतात. ‘शाळा बंद-शिक्षण सुरु’ ही अभ्यासमाला सुरु करण्यात आली आहे. याच्या सहायाने देखील विद्यार्थी स्वयं अध्ययनाच्या कार्यात लागली आहेत. मात्र एवढे निश्चित ब्लॅकबोर्ड आणि शिक्षकाशिवाय विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावी होवू शकत नाही.
शिक्षण विभाग विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. यात जिओटीव्ही प्लॅटफॉर्म इयत्ता १२ वि विज्ञान, इयत्ता १० वी इंग्रजी, मराठी या दोन्ही माध्यमांसाठी ३ ज्ञान गंगा चॅनल, जिओ सावन या रेडीओच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या ३ चॅनलवरुन दररोज ६ तास अध्यापनाच्या तासिका प्रक्षेपित केल्या जाणार असून त्याच तासिका १७ तास पुन:प्रक्षेपीत करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत जिओ सिमधारकांना जिओटिव्ही याद्वारे चॅनल जिओ मोबाईल व इंटरनेटसुविधा असणे आवश्यक आहे. या सर्व शैक्षणिक सोई सुविधा शहरातील श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अधिक लाभदायक होवू शकतात. मात्र यामध्ये ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी निश्चितच मागे पडतील यात शंका नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोलकी पुस्तके सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या सर्व शिक्षण प्रक्रिया मात्र प्रत्यक्षात ब्लॅकबोर्ड आणि शिक्षकाशिवाय अपुऱ्या आहेत.

Web Title: Implementing various means of education for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.