शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

मतदार ओळखपत्राबाबत ही चूक केल्यास होईल तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:44 IST

Gondia : मतदार यादीत एकापेक्षा जास्तवेळा मतदार म्हणून नोंदणी केल्यास गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. असे असताना अनेकांची मतदार ओळखपत्र काढण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, हे मतदान ओळखपत्र काढताना ही चूक झाल्यास तुम्हाला तब्बल एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.

यापासून बचाव करण्यासाठी ही माहिती असणे आवश्यक आहे. निवडणूक ओळखपत्र आजही खूप महत्त्वाचे आहे. केवळ निवडणूक आली की नाही तर इतर सरकारी कामांसाठीदेखील हे ओळखपत्र उपयोगी पडते. परंतु, आजही अनेकांकडे एकापेक्षा जास्त ठिकाणची ओळखपत्रे असतात. अशाप्रकारे एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक व्होटिंग कार्ड असणे गुन्हा आहे. यासाठी एक वर्षाची शिक्षादेखील होऊ शकते.

ऑनलाइन सुविधा उपलब्ध ऑनलाइनसाठी तुम्हाला ईसीआयच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. तिथे तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवून तुम्ही नको असलेले व्होटिंग आयडी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म-७ भरावा लागेल. तुमचे ओळखपत्र रद्द झालेय का? हे तपासण्यासाठी तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता. 

सरेंडर कसे करावे एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी तुम्हाला फॉर्म-७ भरणे गरजेचे आहे. ही प्रोसेस तुम्ही ऑनलाइन किवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता. सर्व माहिती योग्य भरल्यास तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

नको असलेले कार्ड रद्द करातुमच्याकडे असेच जुने, गावाकडचे निवडणूक ओळखपत्र असेल तर ते सरेंडर करा, यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया आहे. ऑफलाइन म्हणजेच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक विभागात जाऊन अर्ज करून तुम्ही तुमचे नको असलेले ओळखपत्र रद्द करू शकता.

तरच होईल तुरुंगवासमतदार ओळखपत्र हा एक आवश्यक सरकारी दस्तऐवज आहे. नागरिकांना मतदानात सहभागी करून घेण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य असते. पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र बाळगल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. कारण मतदार यादीत एकापेक्षा जास्तवेळा मतदार म्हणून नोंदणी केल्यास तो एक गुन्हा धरला जातो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदियाElectionनिवडणूक 2024Votingमतदान