शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत क्षेत्रातील शेकडो कुटुंबांना अजूनही घरकुलाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:50 IST

घरकुलासाठी वन कायद्याचा अडथळा : शबरी आदिवासी घरकुल योजनेचाही लाभ नाही

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सर्वांना पक्की घरे, शौचालय आणि पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक गरजू व्यक्तीला आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी निधी दिला जात आहे. परंतु, सालेकसा नगरपंचायत अंतर्गत अनेक आदिवासी कुटुंब मागील पन्नास वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. शेकडो आदिवासी कुटुंब आजही कुळा मातीच्या घरात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरता तयार केलेल्या निवाऱ्यात वास्तव्य करीत असल्याचे चित्र आहे.

सालेकसा नगरपंचायत परिसरात जवळपास २८ टक्के कुटुंब आदिवासी प्रवर्गातील आहे. नगरपंचायत पंचायत क्षेत्रातील जुना सालेकसा हलबीटोला, बाकलसर्रा, जांभळी, कोवाचीटोला या गावांमध्ये प्रमाणावर लोक आदिवासी वास्तव्यास आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. मोलमजुरी व वनउपजावर आधारित जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे अनेक आदिवासी लोक आजही कुडा मातीच्या निवाऱ्यात राहत आहे. यापैकी काही कुटुंबाचे घर झुडपी जंगलाच्या जमिनीत बांधलेले असून, वन कायद्याच्या अडथळ्यामुळे त्यांना शासनाच्या आवास योजनेच्या लाभमिळत नाही. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून ते या परिसरात वास्तव्यास असले तरी त्यांना पक्की घरे मिळाले नाही. अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांना शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी निधी दिला जातो, तर अनुसूचित जमातीच्या लोकांना शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी शासनाकडून मदत दिली जाते. इतर लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधून दिली जातात. नगरपंचायतच्या हद्दीमध्ये राहणारे आदिवासी कुटुंबापैकी काही कुटुंब गावठाणच्या जागेवर वास्तव्य करीत आहेत, तर बरेच कुटुंब झुडपी जंगलाच्या जागेवर घरे तयार करून राहतात. परंतु, अनेक कुटुंब असे आहेत की ते पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून वास्तव्य करीत असले तरी ती जागा झुडपी जंगलाची असल्याने त्यांना आवास योजनेच्या लाभ मिळत नाही.

शबरी योजनेचाही लाभ मिळेनाआदिवासी लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावे म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत शबरी घरकुल योजना ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते. परंतु, गृहनिर्माण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपंचायतमध्ये यंत्रणा नसल्याने त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले. नगरपंचायत अंतर्गत येणारे आदिवासींचे घरकुलासाठीचे अर्ज आदिवासी प्रकल्प विभागाकडे पाठविण्याची तरतूद केली. त्यानुसार सालेकसा नगरपंचायतमध्ये अनेक कुटुंबांनी शबरी आवास योजनेसाठी अर्ज केला. ते अर्ज नगरपंचायतीने आदिवासी प्रकल्प विभाग देवरीकडे पाठविले आहे. परंतु, दोन वर्ष लोटले तरी त्यांना या योजनेचा लाभमिळाला नाही,

"माझे कुटुंब मागील पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून याच जागेवर वास्तव्य करीत आहे. आम्ही आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अनेक वेळा अर्ज केला. परंतु, तुमची जागा जंगल झुडपीमध्ये येते असे सांगत घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. नाइलाजाने आम्हाला झोपडीत राहावे लागत आहे."- सोनाबाई धुर्वे, मु. जांभळी न.प. सालेकसा

टॅग्स :gondiya-acगोंदिया