शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
2
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
3
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
4
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
5
Pune Porsche Accident News इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
6
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
7
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
8
"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
9
IPL संपताच जय शाह यांची मोठी घोषणा; Ground Staff कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे बक्षीस
10
जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर
11
Pune Porsche Accident News रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
12
गौतम गंभीर तर आहेच... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातील हेही शिलेदार
13
Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य
14
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
15
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
16
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
17
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
18
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
19
Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
20
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

डॉक्टरातही असतो माणुसकीचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 9:03 PM

एखाद्या भिकारी व वेड्यापिशा व्यक्तीप्रती माणूसकी दाखविणारे व्यक्ती फारच कमी असतात. त्या वेड्या माणसाला जवळ करणे त्याच्या जेवण व राहण्यासह पिण्याच्या पाण्याची सोय करणारा व्यक्ती आज शोधूनही सापडत नाही.

ठळक मुद्देवेडसर माणसाला मदतीचा हात। जेवण व पिण्याच्या पाण्याची केली सोय

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : एखाद्या भिकारी व वेड्यापिशा व्यक्तीप्रती माणूसकी दाखविणारे व्यक्ती फारच कमी असतात. त्या वेड्या माणसाला जवळ करणे त्याच्या जेवण व राहण्यासह पिण्याच्या पाण्याची सोय करणारा व्यक्ती आज शोधूनही सापडत नाही. पण एका शासकीय आरोग्य विभागात नोकरी करुन एका वेड्याची काळजी घेणारा माणूस तालुक्यातील ग्राम खोडशिवनी येथे बघावयास मिळत आहे.खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत डॉ. समीर गहाणे हे गिरोला-खोडशिवनी मार्गाने येत असता त्यांना एक वेडसर इसम रस्त्याच्याकडेला दिसला. जानेवारी महिन्यात दिसलेल्या या वेडसर इसमाची दाढी-मिशी व केस वाढलेले होते. डॉ. गहाणे यांच्या मनात नेहमी त्या वेडसर इसमाच्या जेवण व पाण्याविषयी नेहमी प्रश्न निर्माण होत होते. तो इसम एखाद्या दिवसी अन्न व पाण्याविना मरुन गेला तर असे विविध प्रश्न त्यांच्या मनात दोन दिवस घोंगावत होते.एक दिवशी त्यांनी आपली गाडी थांबवून त्या वेडसर इसमाची विचारपूस केली. मात्र तो जास्त काहीच बोलत नव्हता. डॉ. गहाणे यांनी त्याला आपला रोजचा जेवणाचा डब्बा व पिण्याच्या पाण्याची बाटली दिली. त्या वेड्याने जेवण करून पाणी पिले त्यात डॉ. गहाणेंच्या मनाला समाधान वाटले. तेव्हाच त्यांनी मनात निश्चय केला की त्या इसमाला रोज जेवण व पिण्याचे पाण्याची सोय करावी. त्याप्रमाणे खोडशिवनी येथील कंगाले या महिलेकडून डब्बा बनवून रोज त्या इसमापर्यंत सकाळ-सायंकाळी पोहचवून देण्याच्या कामात गावातीलच विलास यांनी मदत केली.त्या इसमाची दाढी-मिशी व केस वाढल्याने गावकऱ्यांच्या मदतीने डॉ. गहाणे यांनी त्याचे केस कापले.तसेच त्या इसमाच्या रोजच्या डब्याचा खर्च डॉ. गहाणे यांनी उचलला तर देवा कापगते यांनी नवीन कपडे घेवून दिले. रुग्ण सेवेसोबत अनाथाची आई व एखाद्याचा कुणीच वाली नाही त्याचा भाऊ होण्यास धन्यता मानणाऱ्या डॉ. गहाणे यांना बघून डॉक्टरालाही असतो माणूसकीचा झरा असे म्हटले जात आहे.उपचारासाठी रूग्णालयात केले दाखलबघता-बघता उन्हाळा सुरु झाल्याने उन्हात तो वेडसर इमस मरुन जाईल, त्यामुळे देवराज मुनेश्वर व सतीमेश्राम यांच्या मदतीने साकोली येथील दवाखान्यात उपचार करुन त्या इसमाला भंडारा जिल्हा रुग्णालयात भर्ती केले. तसेच भंडाराचे जिल्हा न्यायाधीश यांच्या व पोलिसांच्या परवानगीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील मनोरूग्णांच्या हॉस्पीटल मध्ये भर्ती करण्यात आले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर