शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत घर जळून खाक

By अंकुश गुंडावार | Updated: June 12, 2025 18:50 IST

चार भावंडांचे कुटुंब उघड्यावर : तुबंडीकसा येथील घटना : घटनेच्या धक्क्याने आईचा मृत्यू

देवरी : तालुक्यातील ककोडी क्षेत्रातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे १० जून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन त्याची ठिणगी घरावर पडल्याने लागलेल्या आगीत अरकरा यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. यामुळे चार भावंडांचे कुटुंब उघड्यावर आले. तर या घटनेचा धसका घेतल्याने अरकरा यांच्या आईचे बुधवारी (दि.११) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे अरकरा कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले.

प्राप्त माहितीनुसार मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे गिरधारी अरकरा, विनोद, रामू आणि मेसराम या चार भावांचे कुटुंब आईसह एकाच घरात राहत होते. अरकरा हे १० रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेजारच्या घरी बसलेले होते. दरम्यान अचानक सोसायट्याचा वारा सुरू झाल्याने घरावरून जाणाऱ्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन आगीची ठिणगी अरकरा यांच्या घरावर पडली. वाऱ्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. शेजारी व गावकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी अरकरा यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात येईपर्यंत चारही भावांचे संपूर्ण घर जळून राख झाले होते. आगीत पैसे, धान्य, कपडे, तांदूळ, शेतीकरिता घेतलेले बियाणे, महत्वपूर्ण दस्तऐवज पूर्णतः जळाले. तलाठी गायधने, कोतवाल कोटांगले, सरपंच रामदेव सौरी, पोलिस पाटील गुलाबदास हिरवाणी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा तयार करून शासनाला अहवाल पाठविला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली. तरी आगीमुळे चार भावंडांचा घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अरकरा कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने अरकरा कुटुंबीयास आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.

घटनेच्या धसक्याने आईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात आता आपले कुटुंब सावरणार कसे अशी चिंता चारही भावडांची आई मानकुवर लतखोर अरकरा (६०) यांना सतावू लागली. तर घर जळाल्याचे दु:ख त्या सहन करु शकल्या नाही. यातच गुरुवारी (दि.११) त्यांचे हृदयविकाराचा धक्क्याने निधन झाले. त्यामुळे अरकरा कुटुंबीयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाAccidentअपघातfireआग