हॉटेल्स झाले सुरू पण ग्राहकांचेच वेट अँन्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 05:00 AM2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:09+5:30

जिल्हा प्रशासनाने हॉटेल्स व्यवसायिकांना वेळेबाबत अजुनही स्पष्ट सूचना न दिल्याने सायंकाळी ७ वाजतापर्यंत अन्य व्यवसायांप्रमाणेच हॉटेल्स सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल्सचा व्यवसायच रात्रीला सुरू होत असून सायंकाळी ७ वाजता हॉटेल्स बंद करावे लागणार असल्याने व्यवसायी नाराज आहेत.

Hotels started but customers' wait and watch | हॉटेल्स झाले सुरू पण ग्राहकांचेच वेट अँन्ड वॉच

हॉटेल्स झाले सुरू पण ग्राहकांचेच वेट अँन्ड वॉच

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद : वेळेच्या निर्बंंधाने व्यवसायिक नाराज

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुमारे ६ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर राज्य शासनाने हॉटेल्स उघडण्यास सोमवारपासून (दि.५) परवानगी दिल्याने जिल्ह्यातील हॉटेल्स उघडण्यात आलेत. मात्र काही व्यवसायीकांनी अद्यापही वेट अ‍ॅन्ट वॉचची भूमिका घेत हॉटेल्स उघडलेच नाहीत. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा सुध्दा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
जिल्हा प्रशासनाने हॉटेल्स व्यवसायिकांना वेळेबाबत अजुनही स्पष्ट सूचना न दिल्याने सायंकाळी ७ वाजतापर्यंत अन्य व्यवसायांप्रमाणेच हॉटेल्स सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल्सचा व्यवसायच रात्रीला सुरू होत असून सायंकाळी ७ वाजता हॉटेल्स बंद करावे लागणार असल्याने व्यवसायी नाराज आहेत. अशात राज्य शासनाने आता अनलॉक ५ अंतर्गत सर्वच काही सुरू केले असताना हॉटेल्सलाही वेळेच निर्बंध लावू नये अशी मागणी व्यवसायी करीत आहेत.

घेतली जाणारी दक्षता : कोरोनाचा संसर्ग बघता अन्य व्यवसायीकांप्रमाणे हॉटेल्स व्यवसायीकांनीही शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन ठेवली आहे. सॅनिटायजरचा वापरही करीत आहेत. काही व्यावसायिकांनी डिस्पोजेबल भांडयांचा वापर सुरू केला आहे. याशिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचेही काटेकोरपणे पालन केले जात होते.

वेळेला घेऊन संभ्रम
राज्य शासनाच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील हॉटेल्सही सुरू होणार आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप यासाठी काही विशेष सूचना दिलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, रात्री किती वाजतापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवायचे याबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या नसल्याने व्यवसायी संभ्रमात आहेत.

हॉटेल्स सुरू झाल्याने खवय्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सायंकाळी ७ वाजतापर्यंतच हॉटेल्स सुरू राहणार असल्याने कुटुंबासह ज्यांना जेवणासाठी जायचे आहे त्यांची मात्र गैरसोय होणार आहे.
-विजय कोरे,
ग्राहक

जिल्ह्यातील स्थिती बघता सायंकाळी ७ वाजतापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवायचे आहेत. मात्र आमचा व्यवसायच रात्रीला सुरू होतो. यामुळे आता हॉटेल्स सुरू होऊनही काही फायदा नसल्याने वेळेचे निर्बंध हटविण्याची गरज आहे.
-अखिलेश सेठ
अध्यक्ष, हॉटेल व्यवसायी असोसिएशन

Web Title: Hotels started but customers' wait and watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार