शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न

By अंकुश गुंडावार | Updated: November 20, 2025 12:27 IST

Encounter With Naxalites: महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कंघुराच्या जंगलात शोधमोहिम राबवित असतांना बुधवारी (दि.१९) सुमारास हाॅकफोर्स व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मध्यप्रदेश हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा शहिद झाल्याची घटना घडली.

गोंदिया - महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कंघुराच्या जंगलात शोधमोहिम राबवित असतांना बुधवारी (दि.१९) सुमारास हाॅकफोर्स व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मध्यप्रदेश हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा शहिद झाल्याची घटना घडली.

एमएमसी (महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड) झोनमध्ये माओवादी असल्याची गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर सीमेवर मध्यप्रदेश व छत्तीसगड पोलिसांच्यावतीने सीमेवरील बोरतलाव भागाला लागून असलेल्या कांगुराच्या घनदाट जंगलात संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली होती. त्या मोहिमेचे नेतृत्व शर्मा करीत होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या २०-२५ च्या संख्येतील माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना माओवाद्याकडून झालेल्या गोळीबारात पोलीस उपनिरिक्षक शर्मा जखमी झाले. तेव्हा लगेच त्यांना डोंगरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माओवाद्याने केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरिक्षक शर्मा यांच्या हात पाय व पोटावर गोळ्या लागल्याने लगेच त्यांना डोंगरगढ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती राजनादंगावचे पोलीस महानिरिक्षक अभिषेक शांडिल्य यांनी दिली. ज्या कंघुराच्या जंगलात गोळीबार झाला त्या घटनास्थळावर राजनांदगांव पोलीस अधिक्षक अंकिता शर्मा आणि लागूनच असलेल्या खैरागडचे पोलीस अधिक्षक लक्ष्य शर्मा यांनी पोचून शोधमोहिम अधिक जोमाने सुरु केली आहे.

जानेवारीत होणार होते लग्नमध्यप्रदेशातील नरसिंहपुर जिल्ह्यातील गाडरवारा तालुक्यातील बोहानी येथील आशिष शर्मा(वय ४०) रहिवासी असून त्यांना यापुर्वी दोनवेळा भारत सरकारच्यावतीने वीरता पदक मिळाले आहे. शर्मा हे २०१६ मध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून रुजू झाले होते. तर येत्या जानेवारी महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. शर्मा यांनी फेबुवारी २०२५ मध्ये बालाघाट जिल्ह्यातील रोंढा जंगलात झालेल्या नक्षल चकमकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यात तीन महिला माओवाद्यांना ठार केले होते.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकसंवेदनामध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शहिद पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांचे बलिदान हे नक्षलमुक्तीच्या दिशेकरीता त्यांचे बलिदान हे महत्वाचे असल्याचे आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतांना म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anti-Naxal Operation: Police Officer Martyred, Wedding Planned for January

Web Summary : Police Sub-Inspector Ashish Sharma was martyred in a Naxal encounter in Chhattisgarh. Sharma, leading a joint search operation, sustained fatal injuries during the gunfight. He was to be married in January. Chief Minister expressed condolences.
टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादीMadhya Pradeshमध्य प्रदेश