विद्यार्थ्यांनो धनुर्विद्येत नाव कमवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:23 PM2019-09-07T23:23:56+5:302019-09-07T23:24:30+5:30

फुके म्हणाले,धनुर्विद्या हा चांगला खेळ असून बालवयापासून काही आदिवासी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या येते. आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध १८ प्रकारचे खेळ सुरु केल्यामुळे त्यांना आता खेळाच्या विविध क्षेत्रात नाव कमाविता येईल. सरपंच हा गावातून निवडून येत असल्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी आता वाढली आहे.

Have students earn a name in archery | विद्यार्थ्यांनो धनुर्विद्येत नाव कमवा

विद्यार्थ्यांनो धनुर्विद्येत नाव कमवा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री । मजीतपूर येथे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी विद्यार्थी बालवयापासून काटक असतात.त्यांना खेळांमध्ये विशेष आवड असते. त्यांनी खेळांमधून प्रगती करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांनी क्र ीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केली तर त्यांचे भविष्य उज्वल आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी धनुर्विद्येत पारंगत होऊन आपले नाव कमवावे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील मजीतपूर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व अदानी फांऊडेशन यांच्या संयुक्त वतीने धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व सरपंच मेळावा गुरूवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. आ.विजय रहांगडाले मजितपूरच्या सरपंच नंदिनी आंबेडारे,अदानी फाऊंडेशनचे नितीन सिराळकर, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी उपस्थित होते. फुके म्हणाले,धनुर्विद्या हा चांगला खेळ असून बालवयापासून काही आदिवासी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या येते. आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध १८ प्रकारचे खेळ सुरु केल्यामुळे त्यांना आता खेळाच्या विविध क्षेत्रात नाव कमाविता येईल. सरपंच हा गावातून निवडून येत असल्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी आता वाढली आहे. सरपंचानी गाव पातळीवर गावाच्या विकासाचे नियोजन केले पाहिजे.गावाच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. गावाच्या विकासात सर्वोच्च प्राथमिकता पिण्याच्या पाण्याला दिली पाहिजे असा फुके यांनी दिला.कार्यक्रमाला अनेक गावातील सरपंच,आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार जवाहर गाढवे यांनी मानले.
 

Web Title: Have students earn a name in archery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.