शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

‘त्या’ कृषी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:26 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल। अन्यथा परवाना रद्द करणार, बियाण्यांची तपासणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. नोटीसचे उत्तर दिल्यानंतर परवाना रद्द करण्याची कारवाही करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. हीच बाब हेरुन विविध बियाणे कंपन्या सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर सक्रीय झाल्या आहेत. खरीपासाठी शेतकऱ्यांना लागणाºया धानाच्या बियाणांची गरज लक्षात घेवून वर्धा येथील यशोदा सिड्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यातील अनेक शेतकºयांकडून यशोदा १३१२, अहिल्या, हरिमाऊली, अंबिका, चायना राईस, आर.एच.१० या प्रजातीच्या धानाची बुंकीग करुन घेतली. ज्या शेतकऱ्यांनी या धानाची बुंकीग केली त्या शेतकऱ्यांना धानाच्या प्रती बॅगवर १५० रुपयांची सूट मिळेल यासंबंधिचे एक कूपन दिले होते. शिवाय हे कूपन ज्या कृषी केंद्रातून शेतकरी धानाची खरेदी करतील त्या दुकानातून त्यांना सूट दिली जाईल असे सांगितले होते. या कंपनीच्या एजंटनी सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना कुपनचे वितरण करुन बियाणांचे बुकींग करुन घेतले. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खरेदी करताना आपले चारपाचशे रुपये वाचतील या आशेने धानाची बुकींग करुन घेतली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी हे कुपन घेवून कृषी केंद्रात धानाचे बुकींग करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सदर दुकानदार या कंपनीचे बियाणे घेतल्यानंतर सुध्दा कुठलीच सूट देत दिली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.दिलीप गायकवाड, परसराम राऊत, गोपी भोयर, राजाराम झिंगरे, यशवंत गायकवाड, भाऊराव शेंडे, प्रल्हाद गायकवाड, सुभाष बागडे, छगनलाल खोब्रागडे या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने सडक अर्जुनी येथील दोन कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.तसेच कूपन देणे बंद न केल्यास परवाना निलंबित करण्याची तंबी दिली आहे. तसेच नोटीसचे उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.सीमावर्ती भागात शोधमोहीमखरीप हंगामादरम्यान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर्षी कृषी विभागाच्या भरारी पथकाने सीमावर्ती भागातील गावांमध्ये बियाणांची शोध मोहीम मागील आठवडाभरापासून सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेती