शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

अनाथ बालकाचा हरपला नाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

अर्जुनी मोरगावच्या सिव्हिल लाइन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोंडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही. जन्मदात्यांनीच वाळीत टाकले. अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; पण हे हास्य क्षणभंगुर ठरले. सुनीलवर मे महिन्यात काळाने झडप घातली. कोरोनाच्या महामारीत त्याचे अकाली निधन झाले. त्याचे निरागस बाळासोबत रंगविलेले स्वप्न अधुरेच राहिले.

ठळक मुद्देगोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सांत्वना भेट : धीर देत दिला आधार

संतोष बुकावन लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव :  ज्यांनी या जगात आणले, त्यांनीच वाळीत टाकले. अनाथालयात असताना बोलताही येत नव्हते तेव्हा ‘नाथ’ मिळाला. त्याने स्वीकारले. घरपण दिले. माझ्या भविष्याचे स्वप्न रंगवले. सारे काही सुरळीत असतानाच कोरोनाचा शिरकाव झाला. अन् त्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले. गोंदियाचे जिल्हाधिकारी सुद्धा तेवढेच भावुक. त्यांनीही साडी-चोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ देत त्या माउलीला जगण्याचे बळ दिले.अर्जुनी मोरगावच्या सिव्हिल लाइन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोंडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही. जन्मदात्यांनीच वाळीत टाकले. अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; पण हे हास्य क्षणभंगुर ठरले. सुनीलवर मे महिन्यात काळाने झडप घातली. कोरोनाच्या महामारीत त्याचे अकाली निधन झाले. त्याचे निरागस बाळासोबत रंगविलेले स्वप्न अधुरेच राहिले. त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी ती माउली आहे खरी; पण कपाळावरचे कुंकू पुसल्याने तिचे अवसानच गळाले. काय करावे सुचेना. मात्र, प्रशासनातील एक अधिकारी एवढा संवेदनशील असू शकतो,  याचा प्रत्यय त्यावेळी आला, जेव्हा गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन येवले यांच्या घरासमोर थबकले. यादरम्यान घरासमोरून कितीतरी पाऊलं, वाहनं गेली असतील; पण ती थबकली नाहीत. आल्याआल्याच त्यांनी अगदी सामान्य माणसाप्रमाणे विचारपूस केली. अन्नधान्य विचारलं. चिमुकल्याच्या शिक्षणाचं विचारलं. रोजगाराची काय सोय आहे, तेही विचारलं. यापैकी काय हवंय का? त्याची आस्थेने विचारपूस केली. बहिणीला भावाकडून एक भेट म्हणून साडीचोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ आणले. त्याचा स्वीकार कर, असं अत्यंत भावुक होत बोलले. तिच्या डोळ्यांत दुखाश्रू-आनंदाश्रू तरळले. तिनं सुद्धा जिल्हाधिकारी भावाकडून भेटवस्तू स्वीकारल्या. त्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे राजेश खवले. त्यांनी तिला धीर दिला व जाताना मला माझ्या भावाने पाठवले आहे. माझे हे काम आहे, त्यात सहकार्य करा, असे सांगत तहसीलदारांकडे जाण्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

प्रशासनाची सहृदयता कोरोनात कुणी पती-पत्नी, आई-वडील, मुले गमावली. त्यांच्याप्रति सहानुभूती बाळगणं हे सहृदयतेचं लक्षण आहे. नेमकी ही सहृदयता अर्जुनी मोरगाव तालुक्यात बघावयास मिळत आहे. येथील तहसीलदार विनोद मेश्राम हे स्वतः कोरोनात जीव गमावलेल्यांना साडीचोळी, पात्र लाभार्थींना कुटुंब अर्थसाहाय्य, मोफत अन्नधान्याचे रेशन कार्ड, निराधार योजनेचे लाभ मिळण्यासाठी त्यांच्या घरी भेटी देत आहेत. त्यांनी नुकतीच राजोली-भरनोली, मोरगाव, निमगाव, खामखुरा येथे भेट दिली. प्रशासनाची ही सहृदयता व संवेदना बघून सामान्यांनाही आपले कुणीतरी आहे, याचा प्रत्यय येत आहे.

शासनाने मदत द्यावीकोरोना महामारीत अनेकांनी घरचे कर्ते पुरुष गमावले. होते नव्हते ते त्याच्या उपचारात खर्ची झाले. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. ज्यांना रोजगार नाहीत, त्यांनी भविष्याची वाटचाल कशी करायची हा यक्षप्रश्न आहे. एकतर कोरोना आजाराचे वेळी रुग्णालयात झालेला आर्थिक खर्च शासनाने द्यावा, ज्या कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शासनाने आर्थिक मदत करावी, अशी कोरोनामुळे जीव गमावलेल्या कुटुंबीयांची मागणी आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या