शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या लुडबुडीवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेत आजही आपला मनमर्जी कारभार चालवित आहेत. विशेष म्हणजे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकांना कागदपत्र घेऊन बोलाविले व सभा घेतली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.

ठळक मुद्देमुकाअंनी उचलले पाऊल : त्या बैठकीला घेऊन अभियंता व लिपिकाचा घेतला समाचार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सेवानिवृत्ती नंतरही जिल्हा परिषदेच्या कारभारात लुडबुड करीत असलेल्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हरकतींवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी गदा आणली आहे. डॉ. दयानिधी यांनी याप्रकरणी लगेच पाऊल उचलले असून जिल्हाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त अधिकाऱ्याने घेतलेल्या बैठकीला घेऊन बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकाचा समाचार घेतल्याची माहिती आहे.सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेत आजही आपला मनमर्जी कारभार चालवित आहेत. विशेष म्हणजे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकांना कागदपत्र घेऊन बोलाविले व सभा घेतली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच मुकाअ. डॉ. दयानिधी यांनी लगेच बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकाला बोलावून त्यांचा समाचार घेतला. सेवानिवृत्त अति. मुकाअ यांच्याकडे प्रशासकीय कागदपत्रे का नेण्यात आली अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्याचप्रमाणे सध्या करोना संसर्गाच्या काळात शासनाने फक्त ३३ टक्के कामांनाच मंजुरी दिली असून ते सुद्धा आवश्यक असल्यास असे स्पष्ट निर्देश असताना बांधकाम सभापतींनी १०० टक्के कामांचे वितरण करुन टाकले. त्या कामाच्या वितरणात सेवानिवृत्त अतिरिक्त मुकाअ यांची महत्त्वाची भूमिका असून ही सर्व कामे ३१ मार्च पुर्वी दाखिवण्यासाठी सर्व खटाटोप सुरु असून सेवानिवृत्तीनंतर त्याकरीताच अति.मुकाअ हे गोंदियात तळ ठोकून बसल्याची चर्चा कंत्राटदार वर्गासह जिल्हा परिषदेत सुरु आहे. या सर्व प्रकरणात डॉ.दयानिधी यांनी ३३ टक्केवर कुठल्याच कामांना मंजुरी नाही असे सांगत मुख्य लेखा अधिकाºयांना याबाबत निर्देश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.याशिवाय उपविभागातंर्गत असलेले अभियंता टेंभुर्णीकर यांच्याकडे मुख्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीसह निवासस्थानांचे काम सोपविण्यात आले होते. मात्र त्यांनी जानेवारी २०२० मध्येच या कामाचा प्रभार सोडल्याने सध्या कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता व अभियंता अशी तिन्ही कामे एकाच अधिकाºयाला पार पाडण्याची वेळ आली आहे. यावरुन अभियंते मनमर्जीने काम करु लागले की त्यांनी मार्च ३१ रोजी सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त मुकाअच्या जाचाला कंटाळून जानेवारीमध्येच मुख्यालय अभियंत्याचा पदभार सोडला या गोष्टीचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एंटीचेबरच्या दुरुस्तीसह रंगरगोंटीचे तीन लक्ष रुपयांचे काम करण्यात आले. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून प्रशासकीय मान्यतेनुसार लागणाऱ्या गोष्टी तिथे लागल्या नसून सुमारे दोन लाखांवर त्या कामात खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र देयके पूर्ण तीन लाखांचे निघाल्याचे वृत्त आहे. असाच प्रकार अनेक कार्यालयांत सध्या सुरु आहे. तर मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या कार्यालयाच्या कक्षाचे सुद्धा नुतनीकरणाचे काम दीड वर्षातच केले जात असून या कामाची सुरवात झाली असली तरी त्या कामाला प्रशासकीय मान्यता आहे की नाही याबाबत शंकांना पेव फुटले आहे.