शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या ९२ पोलिसांचा दीडपट पगार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्क  गोंदिया :  नक्षलवाद्यांचे रेस्टझोन म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पोलीस जवान नक्षलवाद्यांचा कुटील डाव ...

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  नक्षलवाद्यांचे रेस्टझोन म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पोलीस जवान नक्षलवाद्यांचा कुटील डाव वेळीच हाणून पाडत आहेत. परंतु त्याच पोलिसांना त्यांच्या हक्काचा पगार देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय मागे पडत आहे. आदेश न काढताच जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या तब्बल ९२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व दीडपट वेतनापासून वंचित ठेवले आहे. एप्रिल २०२१ पासून आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यात श्वान पथक, बीडीडीएस पथक, एटीसी, जेटीएससी, व नक्षल सेल अंतर्गत प्रपाेगंडा सेल, इंटरसेप्शनसेल, नक्षल ऑपरेशन सेल, इंटरसेल, टेकसेल यांचे दीडपट वेतन बंद करण्यात आले आहे. त्याबाबतचे कोणतेही आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेले नाहीत. मागील एक वर्षापासून या शाखांमध्ये काम करणारे ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार एकस्तरपदाचे सुद्धा वेतन देण्यात आले नाही. या पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांच्या उदासीनतेमुळे व कामचुकापणामुळे ९२ कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व स्वत:ला लोकसेवक म्हणविणाऱ्या लोकप्रतिनधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची हालत  झाली असून आता त्यांच्याकडे या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी मॅट कोर्टात जाण्यासाठीदेखील पैसे नाहीत. 

इतर विभागांना एकस्तर मग पोलिसांना का नाही?-गोंदिया जिल्ह्यात विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येतो. परंतु गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ का देण्यात येत नाही. जिल्हा परिषद, महसूल, वनविभाग, पाटबंधारे, उपप्रादेशिक परिवहन विभाग, आरोग्य विभाग यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येतो. परंतु गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या ९२ पोलिसांना मागील वर्षभरापासून हा लाभ देण्यात येत नाही.तर निलंबन किंवा ट्रान्सफरची धमकी-नक्षल विरोधी अभियानात काम करणाऱ्या त्या ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मागील १ वर्षापासून दीडपट वेतन किंवा एकस्तर वेतनश्रेणी पोलीस अधीक्षक कार्यालयाने आदेश न काढता बंद केले आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना वेतनाबाबत विचारणा केली तर त्यांना मुरकुटडोहला पाठविण्यात येईल किंवा निलंबित करण्यात करण्यात येईल असे ठणकावले जात असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.

 

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी