शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्यापूर्वीच उपवराला बलात्कार प्रकरणात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 17:49 IST

आमगाव तालुक्याच्या किकरीपार येथील निलेश पुनाराम मोटघरे (२५) असे बलात्कारी उपवराचे नाव आहे. त्याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला मागील तीन वर्षांपासून त्रास द्यायचा.

गोंदिया - गावातील तरुणीला लग्नाचे आमिष देत तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह ठरला. परंतु त्या उपवराने लग्नाच्या दोन दिवसापूर्वी त्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यासंदर्भात त्या उपवरावर आमगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली. परिणामी बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्या उपवराला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली.

आमगाव तालुक्याच्या किकरीपार येथील निलेश पुनाराम मोटघरे (२५) असे बलात्कारी उपवराचे नाव आहे. त्याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला मागील तीन वर्षांपासून त्रास द्यायचा. तिच्याशी जवळीक साधून त्याने तिला लग्नाचे आमिष दिले. त्या आमिषातून त्याने तिचे लैंगिक शोषण केले. वारंवार तिला लग्न करण्याचे आमिष देत तिच्यावर तो लैंगिक अत्याचार करायचा. यंदा त्याच्या घरच्यांनी त्याचे लग्न गोंदिया तालुक्याच्या नवरगावकला येथील एका मुलीशी ठरले. रितीरिवाजाप्रमाणे त्याचा वांगाभात झाला. ४ मे ला मंडपपूजन व ५ मे ला लग्न ठरले. परंतु आरोपी निलेशने लग्नाच्या दोन दिवसापूर्वी म्हणजेच ३ मे रोजी दुपारी ४ वाजता गावातील १९ वर्षाच्या त्या मुलीवर बळजबरी केली. तू मला भेटली नाही तर तुला ठार करीन अशी धमकी तो तिला देत होता. तिला तो वारंवार मारहाणही करीत होता.

३ एप्रिला देखील त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. तू माझी झाली नाहीस तर कुणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी तो तिला देत होता. ३ मे रोजी पीडीता घराच्या मागील भागात शौचासाठी गेली असताना आरोपी तिथे जाऊन त्याने तिच्यावर बळजबरी केली. त्यावेळी तिने आरडाओरड केली असता आरोपीने तिला मारहाण केली. तिची हाक ऐकून नातेवाईक आले असताना आरोपी निलेश पळून गेला. निलेशचा आज ( ५ मे ) रोजी लग्न असताना बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याला आमगाव पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली.  हे प्रकरण दडपण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडीतेला न्याय देण्यासाठी आमगाव पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला. आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४, ३५४ ड, २९४, ३२३, ५०६ (२) सहकलम ४, ८ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

एक वर्षापासून होत होते लैंगिक शोषण

मुलीला धमकी देत तिच्यावर एक वर्षापासून तो बळजबरी करीत होता. गावातील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करीत होता ही बाब डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालातूनही स्पष्ट झाली आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक