शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

लॉकडाऊनच्या कालावधीत मिळाला हातांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात.

ठळक मुद्देग्रामसभेची झाली मदत : ११ दिवसांत अडीचे कोटीचे उत्पन्न

गजानन शिवणकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : ग्रुप ऑफ ग्रामसभा (देवरी) यांनी वनहक्क कायदा २००६ नुसार गठीत ग्रामसंघाच्या महासंघातील आदवासी व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्क धारक) समुदायाने लॉकडाऊनच्या कालावधीत तेंदूपत्ता संकलन व विक्री करुन ११ दिवसांत अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. शिवाय, यामुळे शेकडो हातांना रोजगार सुद्धा मिळाला आहे.मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हे कार्य प्रभावित होऊन अनेक कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. याचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. सदर गावे जंगलालगत असल्याने शेती इतकेच किंबहुना अधिक महत्त्व या वनहक्क धारकाला वनोपज गोळा करुन विकण्यास आहे. तेंदूपत्ता संग्रहनाचे मुख्य ठिकाण देवरी आहे. या महासंघात समाविष्ट एकूण महसुली गावे २८ व टोले, पाडे मिळून ४२ ग्रामसभेतील ५०६९ कुटुंब काम करतात.यामुळे प्रती व्यक्ती १५-२० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पण यंदा कोरोनामुळे तेंदूपत्ता संकलनाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शासनाने तेंदूपत्ता संकलन करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल व इतर उपाययोजना करण्याच्या अटीवर तेंदूपत्ता संकलनास मंजुरी दिली. विदर्भ उपजिवीका मंचचे पदाधिकारी दिलीप गोडे, तांत्रिक अधिकारी वासुदेव कुलमेथे, ललीत भांडारकर तसेच ग्रामसभेचे पदाधिकारी मोतीराम सयाम, नारायण सलामे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. पोलीस अधीक्षकांनी ग्रामसभेत संचारबंदीत नियम व अटीशर्तीच्या आधारे संकलन केंद्र सुरु करण्यात परवानगी दिली. याचा लाभ जिल्ह्यातील अनेक गरीब व गरजू आदिवासी, गैरआदिवासी व भूमिहिन नागरिकांना झाला. यामुळे वनहक्क प्राप्त गावच्या अनेक ग्रामसभा व त्यांचे महासंघांना तेंदूपाने गोळा करुन विक्री करणे शक्य झाले.त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ग्रुप ऑफ ग्रामसभा महासंघात समाविष्ट असलेल्या एकूण ४२ गावांतील एकूण ४८१३४३० तेंदूपुडे वनहक्कधारकांनी प्राप्त अधिकार राबवित संकलीत करुन ५२०९ रुपये प्र.मा.गोणीप्रमाणे विक्री केली. ज्यात २४४० पुरुष व ५९० महिला असे एकूण ३२३० कुटुंबांना सरासरी १५ ते २० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होण्यास मदत झाली. यातून एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. अशाप्रकारे तेंदूपत्ता संकलनाच्या प्राप्त निधीतून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उद्दिष्टाने अनेक गावे विकासात्मक सामूहिक व सामाजिक कार्य ग्रामसभेत सुरु आहेत. विशेष म्हणजे, या भागातील नागरिकांना मालकी हक्क प्राप्त झाल्यामुळे लोक स्वेच्छेने वनांचे संरक्षण करुन तेंदू झाडांच्या बुथ कटाईवर ग्रामसभेत प्रतिबंध लावण्यात आले आहे.यामुळे वृक्षांचे संवर्धन करण्यास मदत होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेकरीता गोडे व त्यांचे सहकारी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर तसेच ग्रुप ऑफ ग्रामसभेचे पदाधिकारी मोतीराम सयाम, नारायम सलामे, तेजराम मडावी यांनी सहकार्य केले.शेती करण्यास झाली मदततेंदूपत्ता संकलनातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामीण भागातील नागरिक खरीप हंगामात शेती करतात. या उत्पन्नातून शेतीच्या मशागतीची कामे, खते, बियाणे, मजुरीचा खर्च देण्यास त्यांना मदत होते. तर काही जण तलाव ठेक्याने घेवून त्यात मासेमारी करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तेंदूपत्ता संकलन करणे महत्त्वपूर्ण रोजगार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक