शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

‘गोरेगाव मंथन ग्रुपने’ घेतला सामाजिक कार्याचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:19 PM

शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिकांचा गोरेगाव मंथन, जय महाकाल निसर्ग मंडळ ग्रुप सामाजिक उपक्रमात सहभागात युवक आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. सामाजिक उपक्रम असो वा कामाचे नियोजन असो सर्व सदस्य सक्रिय होवून ते काम हाती घेऊन तडीस नेतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । श्रमदानातून परिसराचा कायापालट : युवकांसह नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिकांचा गोरेगाव मंथन, जय महाकाल निसर्ग मंडळ ग्रुप सामाजिक उपक्रमात सहभागात युवक आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. सामाजिक उपक्रम असो वा कामाचे नियोजन असो सर्व सदस्य सक्रिय होवून ते काम हाती घेऊन तडीस नेतात.त्यांच्या उपक्रमात खुद्द नगर पंचायत प्रशासनही मदतीस उतरत आहे हे विशेष.मागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्यक्षात सामाजिक उपक्रमात सक्रिय झालेला गोरेगाव मंथन, जय महकाल व निसर्ग मंडळ, व्हॉटसअप ग्रुपने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. सर्वप्रथम गोरेगाव मंथन ग्रुपच्या काही सदस्यांनी, युवा स्पोर्टस क्लब व गायत्री परिवाराला सोबत घेऊन तब्बल ३६ आठवडे श्रमदान करुन पवन तलावाच्या कायापालट केला. सध्या या भागात गावकरी व्यायामासाठी येतात, स्थानिक जयमहाकाल ग्रुपने पोलीस स्टेशन वसाहतीत चार दिवस स्वच्छता अभियान राबवून सामाजिक कार्याला हातभार लावला. निसर्ग मंडळ ग्रुपने निसर्ग, प्राण्याप्रती, स्वच्छता अभियानात मोलाची भूमिका बजावली. व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून एकीकडे सामाजिक चळवळ तयार होत असताना या साऱ्या कार्याकडे लक्ष देत येथील नगरपंचायत हातभार लावायला विसरले नाही. पोलीस वसाहतीत जय महाकाल ग्रुपच्या स्वच्छता अभियानात नगरपंचायतची भूमिका सुध्दा महत्त्वाची होती.ज्या समाजात जगलो, वावरलो त्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावनाच सर्वांना सामाजिक चळवळीत उतरायला भाग पाडत आहे.गोरेगाव शहराच्या विकासासोबतच सर्वाचे तारतम्य महत्त्वाचे आहे. सर्व एकदिलाने कामे करीत असल्यामुळे श्रमदानातून बरीच विकासाची कामे केली जात आहे. ही बाब सर्वांच्या ध्यानीमनी आहे.या तिन्ही ग्रुपचे विशिष्ट आवडीनिवडीचे सदस्य आहेत. शेतकऱ्यांपासून ते राजकारणी, निसर्गप्रेमी, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यीक, शासकीय कर्मचारी, कवी, पत्रकार, शिक्षण घेणारी मुले, व्यावसायीक या लोकांचा भरणा आहे.त्यामुळे सामाजिक चळवळ उभी करताना वा कुणी सामाजिक काम म्हणून श्रमदान करीत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे, मदत करणे हे काम या ग्रुपचे नित्याचेच झाले आहे.गोरेगाव मंथन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप केवळ मनोरंजना पुरता मर्यादित नाही. या ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे या ग्रुपचा सदस्य असल्याचा अभिमान आहे.-टिटू जैने, शेतकरीगोरेगाव मंथन ग्रुपवर बरेच लोक जुडलेले आहेत. त्या सर्वांकडे सामाजिक प्रश्न सोडविण्याची जिद्द आहे. त्यामुळे श्रमदानातून सामाजिक ज्वलंत प्रश्नाला हात लावला जात आहे.- विकास बारेवार, सामाजिक कार्यकर्ता.