शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जि.प.चे दुटप्पी धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे यंत्रणेला सहाय्य होण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे शिक्षकांना कोविड आजाराशी संबंधित कामकाजात एप्रिल- मे महिन्यापासून अधिग्रहित करण्यात आले आहे. परंतु अधिक काळ शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शक्य नसले तरी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देकोविड ड्युटीतून माध्यमिकला वगळले : प्राथमिकचे शिक्षक गुंतलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोविड कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करून ऑनलाईन शिक्षणप्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घेण्याचे शासनादेश असताना गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र प्राथमिक शिक्षक अजूनही कोविड कामात गुंतूनच आहेत.या शिक्षकांमागे कोविड कामासोबतच गृहमाला, सर्वे, गृहभेटीचा तगादा अजूनही सुरूच असल्याची बाब उजेडात आली आहे.सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे यंत्रणेला सहाय्य होण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे शिक्षकांना कोविड आजाराशी संबंधित कामकाजात एप्रिल- मे महिन्यापासून अधिग्रहित करण्यात आले आहे. परंतु अधिक काळ शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शक्य नसले तरी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे १७ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार कोविड आजारासंबंधीत काममाजासाठी अधिग्रहित करण्यात शिक्षकांना कार्यमुक्त करून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घेण्याचे निर्देश दिले आहे. या आदेशानुसार गोंदिया जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे यांनी २४ ऑगस्टच्या पत्राअन्वये माध्यमिक शिक्षकांना कोविड कामातून कार्यमुक्त करून ऑनलाईन शिक्षण प्रक्रि येत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहे. एवढेच नव्हे तर ३१ आॅगस्टच्या आदेशानुसार गृहमाला उपक्र म स्थगित करून शिक्षकांनी गृहभेटी वा प्रत्यक्ष शाळेत बोलावून शिक्षण न देता आॅनलाईन शिक्षणच द्यावे असे स्पष्टपणे आदेशीत केले आहे. याच गोंदिया जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांबाबत मात्र दुटप्पीपणा केला जात आहे.जिल्ह्यातील शेकडो प्राथमिक शिक्षक अजुनही कोविड आजाराशी संबंधित कामाजात कार्यरत असून रांत्रदिवस ड्युटी करीत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमागे कंटेन्मेंट झोन मधील दिवस रात्र ड्युटीसोबतच अ‍ॅक्टिव्ह सर्वे, गृहमाला, गृहभेटीचा तगादा अद्यापही कायम आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांचे १२ ऑगस्टच्या पत्रानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमागे मागे लावलेला गृहमाला उपक्र म अजूनही सुरूच आहे. सदर उपक्र मात शिक्षकांना गृहभेट अनिवार्य असून यात विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता गावातील चावडीवर प्रत्यक्ष शिक्षण देण्याचे, दर गुरुवारी गृहभेटीची माहिती, छायाचित्रे पाठविण्याचे आदेशीत आहे.प्राथमिक शिक्षकांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त कराएकीकडे माध्यमिक शिक्षकांना कोविड ड्युटी, गृहमाला,गृहभेटी यातून वगळले असताना जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या दुटप्पीपणाचा कोप भोगत आहेत. शासनादेश प्राथमिक शिक्षकांना लागू नाही काय असा सवालही शिक्षक वर्गातून उपस्थित केला जात आहे. याकडे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवसे यांनी लक्ष देऊन प्राथमिक शिक्षकांना कोविड आजारासंबंधीत कामाकाजातून कार्यमुक्त करून ऑनलाईन पध्दतीने शिक्षण प्रक्रि येत सामावून घेण्याची एकमुखी मागणी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद